कोल्हापूर : राजेंद्रनगर झोपडपट्टी येथे शुक्रवारी मोबाईल व्हॅनद्वारे केलेल्या रॅपिड अँटिजेन टेस्टमध्ये नऊ नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.कोरोनामुळे शहरात संचारबंदी असतानाही अत्यावश्यक कामाच्या नावाखाली नागरिक गर्दी करीत आहेत. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी महापालिकेच्यावतीने मोबाईल व्हॅनद्वारे रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात येत आहे. राजेंद्रनगर झोपडपट्टी येथे ६९ नागरिकांची रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आली. यामध्ये ६० जणांचे अहवाल निगेटिव्ह, तर नऊ नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.आरोग्य विभागातर्फे २ हजार नागरिकांचे सर्वेक्षण कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांतर्गत शुक्रवारी ११ नागरी आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या भागातील ६२० घरांचे सर्वेक्षण व २ हजार २६० नागरिकांची तपासणी करण्यात आली. यात १४९ नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले.हे सर्वेक्षण प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे व आरोग्याधिकारी डॉ. अशोक पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाने केली. यात मरगाई मंदिर, राजाराम रोड, राजारामपुरी, मातंग वसाहत, दौलतनगर, प्रतिभानगर, साईक्स एक्सटेंशन, विक्रमनगर, माकडवाला वसाहत, माळे कॉलनी, लक्षतीर्थ वसाहत, नाना पाटील नगर या परिसराचा समावेश आहे.
corona cases in kolhapur : राजेंद्र नगरात नऊ नागरिक पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 20:07 IST
CoroanVirus Kolhapur : राजेंद्रनगर झोपडपट्टी येथे शुक्रवारी मोबाईल व्हॅनद्वारे केलेल्या रॅपिड अँटिजेन टेस्टमध्ये नऊ नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
corona cases in kolhapur : राजेंद्र नगरात नऊ नागरिक पॉझिटिव्ह
ठळक मुद्देराजेंद्र नगरात नऊ नागरिक पॉझिटिव्हआरोग्य विभागातर्फे २ हजार नागरिकांचे सर्वेक्षण