शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

corona cases in kolhapur : लॉकडाऊनच्या भीतीने सकाळी बाजारात गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 20:25 IST

CoronaVirus Market Kolhapur : येत्या दोन दिवसांत कडक लॉकडाऊन होणार असल्याच्या चर्चेमुळे, तसेच येऊ घातलेल्या अक्षयतृतीया व रमजान ईदमुळे मंगळवारी कोल्हापूर शहरातील बाजारपेठेत नागरिकांची मोठी गर्दी उसळली. विशेषत: लक्ष्मीपुरी धान्य बाजारात धान्याची आवकजावक झाल्याने वाहनांचीही कोंडी झाली. सकाळी आठ वाजेपासून साडेअकरा वाजेपर्यंत ही गर्दी कायम होती.

ठळक मुद्देलॉकडाऊनच्या भीतीने सकाळी बाजारात गर्दीधान्य बाजारात वाहनांचीही कोंडी

कोल्हापूर : येत्या दोन दिवसांत कडक लॉकडाऊन होणार असल्याच्या चर्चेमुळे, तसेच येऊ घातलेल्या अक्षयतृतीया व रमजान ईदमुळे मंगळवारी कोल्हापूर शहरातील बाजारपेठेत नागरिकांची मोठी गर्दी उसळली. विशेषत: लक्ष्मीपुरी धान्य बाजारात धान्याची आवकजावक झाल्याने वाहनांचीही कोंडी झाली. सकाळी आठ वाजेपासून साडेअकरा वाजेपर्यंत ही गर्दी कायम होती.राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी येत्या दोन दिवसांत कडक लॉकडाऊन करावा लागेल, त्याशिवाय कोरोना संसर्गाची साखळी तुटणार नाही, असे वक्तव्य केले होते. त्यामुळे शुक्रवारी रात्री आठ वाजेपासून जिल्ह्यात कडक लॉकडाऊन होणार याची धास्ती नागरिकांमध्ये आहे. दोन दिवसांवर रमजान ईद, अक्षयतृतीया, शिवजयंती असे महत्त्वाचे सण आहेत. त्याच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत गर्दी उसळली.शहरातील लक्ष्मीपुरी, राजारामपुरी, शाहूपुरी, महानगरपालिका परिसर, ताराबाई रोड, शिंगोशी मार्केट परिसरातील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी सात वाजता सुरू झाली. तेव्हापासून रस्त्यावर वर्दळ सुरू झाली. लक्ष्मीपुरीत तर बाहेरून आलेले धान्याचे ट्रक, टेम्पो, हौदा रिक्षांच्या गर्दीने धान्य बाजारातील रस्त्यावर साडेआठ वाजताच वाहतुकीची कोंडी झाली होती. धान्यासह मिरच्या, मसाले घेणाऱ्यांची संख्याही मोठी होती.गुरुवारी रमजान ईद साजरी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुस्लिम बांधवदेखील सकाळी लवकर खरेदीसाठी बाहेर पडले. सुका मेवा, शेवया, तसेच अन्य साहित्य खरेदीकरिता महानगरपालिका, बाजारगेट, काळाईमाम परिसरात दुकानांसमोर रांगा लागल्या होत्या. शिवाजी मार्केट येथेही अशी गर्दी होती. याशिवाय नेहमीप्रमाणे भाजी खरेदीकरिता शहरातील सर्वच मंडईत नागरिक मोठ्या संख्येने जमले होते.दुपारनंतर रस्त्यावरील गर्दी कमी झाली; परंतु वर्दळ सुरूच होती. काही दुकानदार दारात उभे राहून गिऱ्हाईक आले की त्यांना लागणारा माल देताना दिसत होते. सण असल्यामुळे या प्रकाराकडे पालिका व पोलीस प्रशासनाने डोळेझाक केली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूरMarketबाजार