शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

corona cases in kolhapur : कोल्हापूरचा मृत्यूदर देशात जास्त हा गैरसमज : जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 11:45 IST

corona cases in kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाने मृत्यू झालेली रुग्णसंख्या ३ हजार असून उर्वरीत ४५० मृत्यू हे अन्य राज्य व जिल्ह्यातील आहेत. सध्या जिल्ह्याचा मृत्यूदर २.९० टक्के इतका असून तो अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत कमी आहे, त्यामुळे जिल्ह्याचा मृत्यूदर हा देशात आणि राज्यात जास्त आहे हे खरे नसल्याचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी स्पष्ट केले.

ठळक मुद्देकोल्हापूरचा मृत्यूदर देशात जास्त हा गैरसमज : जिल्हाधिकारी दौलत देसाई मृत्यूदर २.९० टक्केच, अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत कमी

कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोनाने मृत्यू झालेली रुग्णसंख्या ३ हजार असून उर्वरीत ४५० मृत्यू हे अन्य राज्य व जिल्ह्यातील आहेत. सध्या जिल्ह्याचा मृत्यूदर २.९० टक्के इतका असून तो अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत कमी आहे, त्यामुळे जिल्ह्याचा मृत्यूदर हा देशात आणि राज्यात जास्त आहे हे खरे नसल्याचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी स्पष्ट केले.

चाचण्या वाढवल्याने पॉझिटिव्ह रुग्ण संख्याही वाढत आहे त्याची नागरिकांनी काळजी करण्याची गरज नाही, असा दिलासाही त्यांनी दिला. जिल्ह्याचा सध्याचा मृत्यूदर २.९० टक्के असून तो पंजाब, हरयाणासारख्या अन्य राज्यांच्या व मुंबई, पुणे, सांगली, सातारा, नागपूर, उस्मानाबाद अशा अन्य जिल्ह्यांच्या तुलनेतदेखील कमी आहे.गेल्या महिन्याभरापासून सातत्याने कोल्हापूर जिल्ह्याचा कोरोना मृत्यूदर देशात जास्त असल्याचे म्हटले जात आहे हा गैरसमज असून अन्य जिल्ह्याच्या तुलनेत येथील मृत्यूदर खूप कमी आहे, हे समजावे यासाठी त्यांनी जिल्ह्याची कोरोना सद्यस्थिती सांगितली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे उपस्थित होते.जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, कोल्हापुरात उपचारासाठी अन्य जिल्ह्यातून येणाऱ्यांची संख्या मोठी असून त्यांच्यामुळे जिल्ह्याचा मृत्यूदर जास्त दिसत आहे. जिल्ह्यात ६० वर्षांवरील मृत्यू ५३ टक्के असून त्यापैकी ८० टक्के लोकांना एकही लस घेतलेली नाही.

४० टक्के लोक उपचारासाठी उशिरा दाखल झाले. तर ४५ वर्षांवरील २० टक्के लोक व्याधीग्रस्त होते. डेथ ऑडिटनुसार ४० टक्के लोकांचा मृत्यू रुग्णालयात दाखल झाल्यापासून ३ दिवसात झाला आहे, याचा अर्थ गंभीर स्थिती निर्माण झाल्यावरच ते उपचारासाठी आले आहेत.मृत्यूदरबाधितांच्या संख्येवरून ठरवला जातो, तो लोकसंख्येचा आधारावर काढला तर जिल्ह्याची लोकसंख्या ४२ लाख आहे, त्यानुसार १० लाख लोकांमागे ७०० जणांचा मृत्यू झाला आहे. बाधितांचे प्रमाण २४ हजार इतके आहे. डेथ ऑडिटसाठी जिल्हा टास्क फोर्स स्थापन करण्यात आले असून प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली त्या त्या तालुक्यांसाठी समिती नियुक्त करण्यात आली असल्याचेही जिल्हाधिकारी देसाई यांनी सांगितले.लस ६० वर्षांवरील व व्याधीग्रस्तांसाठीचमृत्यूदर कमी करण्यासाठी महाआयुष अंतर्गत ६० वर्षांवरील व ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्तांचा सर्वेक्षण करण्यात येत असून त्यांची तपासणी, ६ मिनिटं वॉक टेस्ट, लसीकरण याची माहिती घेतली जात आहे. या नागरिकांचेच लसीकरण आधी पूर्ण केले जाणार आहे. सध्या ६० वर्षांवरील नागरिकांचे ८० टक्के तर ४५ वर्षांवरील व्यक्तींचे ६२ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे, आठवड्याभरात ते १०० टक्के करण्याचा प्रयत्न असेल.रोज १२ हजार चाचण्याजिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून रोजच्या बाधीतांची संख्या २ हजार इतकी येत आहे. २० तारखेला जिल्ह्यात रोज ५ हजार चाचण्या केल्या जात होत्या. आता ही संख्या ११ ते १२ हजारांवर गेली आहे. यामुळे लक्षणे नसलेल्या सुपर स्प्रेडरना शोधणे शक्य झाले आहे. यातील ८० टक्के रुग्ण लक्षणे नसलेले आहेत, उर्वरीत ऑक्सिजन व व्हेंटिलेटरची गरज असलेल्या २० टक्के लोकांवर जास्त लक्ष केंद्रित करून त्यांच्यावर वेळेत उपचार करणे हा यामागचा उद्देश आहे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.१० लाख लोकसंख्येमागे मृत्यूचे प्रमाण (२४ मे)जिल्हा          मृत्यू

  • मुंबई : १ हजार १२३.४७
  • नागपूर : १ हजार २१४.३
  • पुणे : १ हजार ४७.७
  • सातारा : ८५८.५
  • सांगली : ८७७.४
  • रायगड : ८५०.५
  • ठाणे : ७६८.६
  • सिंधुदुर्ग : ६५४.७
  • उस्मानाबाद : ६८२
  • कोल्हापूर : ६७४.९

राज्यांचा मृत्यूदर (२५ मे)

  • महाराष्ट्र : ३.१
  • पंजाब : ४.८
  • उत्तर प्रदेश : ३.०
  • झारखंड : २.४
  • मध्य प्रदेश : २.३
  • हिमाचल प्रदेश : २.३
  • हरयाणा : २.२

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर