कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोना चाचण्या वाढविण्यात आल्यामुळे रुग्णांचीही संख्या वाढत असून, सोमवारी नव्या १९१९ रुग्णांची भर पडली आहे. ४० जणांचा मृत्यू झाला असून, यामध्ये कोल्हापूर शहरातील ११ जणांचा समावेश आहे. १२९७ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
रुग्णसंख्या कमी येत नसल्यामुळे जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनला मुदतवाढ दिली आहे. परंतु सकाळी होणारी गर्दी कमी व्हायला तयार नाही. शिवाय दिवसभरातील रस्त्यावरील वर्दळही वाढली आहे.कोल्हापूर शहरात ४३३ नवे कोरोनाग्रस्त आढळले असून, करवीर तालुक्यातील ३०३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. हातकणंगले तालुक्यात १८९ जण पॉझिटिव्ह आले आहेत. करवीर आणि हातकणंगले तालुक्यात प्रत्येकी सहा जणांचा मृत्यू झाला आहे.मृतांची आकडेवारीकोल्हापूर ११बोंद्रेनगर, मंगेशकरनगर, हनुमाननगर, यादवनगर, सानेगुरुजी वसाहत, ताराबाई पार्क, दादू चौगुलेनगर, क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, कळंबा रोड, श्रीकृष्णनगर फुलेवाडी २करवीर ०६पाचगाव, कंदलगाव, शिये, चिंचवडे, गिरगाव, गोकुळ शिरगावहातकणंगले ०६नवे चावरे, जंगमवाडी, कुंभोज, चंदूर, नागाव, हुपरीगडहिंग्लज ०४नेसरी, गिजवणे, नूल, अत्याळकागल ०३चिंचवाड, बेनिक्रे, कागलइचलकरंजी ०२जवाहरनगर, कोरोचीआजरा ०२सुलगाव, आजरापन्हाळा ०१मल्हार पेठशिरोळ ०१राजापूरशाहूवाडी ०१आंबाइतर ०३निपाणी, मीरा-भाईंदर, बेंगलोर