शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी विद्यापीठाचा दीक्षान्त समारंभ २२ फेब्रुवारीला होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 19:24 IST

शिवाजी विद्यापीठाचा ५५ वा दीक्षान्त समारंभ दि. २२ फेब्रुवारीला दुपारी दोन वाजता होणार आहे. विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये होणाऱ्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलपती तथा राज्यपाल सी. विद्यासागर राव, तर बंगलोरच्या नॅशनल असेसमेंट अ‍ॅँड अ‍ॅक्रिडिटेशन कौन्सिलचे (राष्ट्रीय मूल्यांकन एवं प्रत्यायन परिषद) संचालक डॉ. एस. सी. शर्मा प्रमुख उपस्थित असणार आहेत. या वर्षी सुमारे ४९ हजार स्नातकांना पदवी प्रदान केली जाणार आहे, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे यांनी बुधवारी दिली.

ठळक मुद्दे‘नॅक’चे एस. सी. शर्मा यांची प्रमुख उपस्थिती कुलपती राहणार अध्यक्षस्थानी

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचा ५५ वा दीक्षान्त समारंभ दि. २२ फेब्रुवारीला दुपारी दोन वाजता होणार आहे. विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये होणाऱ्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलपती तथा राज्यपाल सी. विद्यासागर राव, तर बंगलोरच्या नॅशनल असेसमेंट अ‍ॅँड अ‍ॅक्रिडिटेशन कौन्सिलचे (राष्ट्रीय मूल्यांकन एवं प्रत्यायन परिषद) संचालक डॉ. एस. सी. शर्मा प्रमुख उपस्थित असणार आहेत. या वर्षी सुमारे ४९ हजार स्नातकांना पदवी प्रदान केली जाणार आहे, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे यांनी बुधवारी दिली.या दीक्षान्त समारंभामध्ये पदवी, पदविका प्रमाणपत्र मागणीसाठीचा अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया जुलै ते सप्टेंबर २०१८ या कालावधीमध्ये राबविण्यात आली. त्याअंतर्गत विद्यापीठाकडे सुमारे ५० हजार अर्ज दाखल झाले. संबंधित प्रक्रिया पूर्णपणे आॅनलाईन राबविण्यात आली. या वर्षी विद्यापीठातर्फे सुमारे ४९ हजार स्नातकांना पदव्या प्रदान केल्या जाणार आहेत. त्यांतील २४ हजार स्नातक हे प्रत्यक्ष उपस्थित राहून पदवी स्वीकारणार आहेत.

उर्वरित स्नातकांना पोस्टाद्वारे पदव्या पाठविण्यात येणार आहे. या समारंभाची तयारी सुरू झाली आहे. नव्या विद्यापीठ कायद्यानुसार या समारंभाच्या आयोजनाबाबत काही बदल करावे लागणार आहेत. काही नव्या बाबींचा अंतर्भाव करावा लागणार आहे. त्याबाबतचा निर्णय या आठवड्यात होणाऱ्या विद्या परिषदेच्या बैठकीत होईल. या समारंभाची आवश्यक ती माहिती स्नातकांना विद्यापीठाच्या संकेतस्थळाच्या माध्यमातून देण्यात येईल, अशी माहिती संचालक काकडे यांनी दिली.

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर