शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
5
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
6
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
7
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
8
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
9
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
10
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
11
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
12
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
13
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
14
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
15
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
16
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
17
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
18
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
19
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?

‘सोयीच्या राजकारणाने’ राष्ट्रवादीची वजाबाकीच

By admin | Updated: April 17, 2015 00:55 IST

के. पी. पाटील : जिल्ह्यात पक्ष रुजविण्यासाठी आतापासूनच कामाला लागण्याची गरज

राजाराम लोंढे - कोल्हापूर -गेल्या पाच वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेसची वाटचाल पाहिली तर पक्षात बेरजेपेक्षा वजाबाकीच अधिक झाल्याने पक्षाचे मोठे नुकसान झाले. ‘सोयीच्या राजकारणा’साठी नेतेमंडळींनी कागल, राधानगरी व चंदगड मतदारसंघांपुरता पक्ष मर्यादित ठेवल्याने उर्वरित ठिकाणी पक्षाचे अस्तित्व शोधावे लागत आहे. के. पी. पाटील यांच्यावर पुन्हा जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली असली तरी ‘सोयीचे राजकारण’ सोडून त्यांना जिल्ह्यात पक्ष रुजविण्यासाठी काम करावे लागेल.राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना कोल्हापुरात झाली, स्वर्गीय दिग्विजय खानविलकर, सदाशिवराव मंडलिक, बाबासाहेब कुपेकर व निवेदिता माने या नेत्यांनी खऱ्या अर्थाने पक्ष जिल्ह्यात वाढविला. पहिल्याच निवडणुकीत पाच आमदार व दोन खासदार राष्ट्रवादीचे निवडून आले. जिल्हा बँक, बाजार समिती, साखर कारखान्यांसह सर्वच सत्ताकेंद्रे राष्ट्रवादीच्या ताब्यात ठेवून सामान्य कार्यकर्त्यांना उभारी दिली. मंडलिक, खानविलकर, निवेदिता माने, कुपेकर, विनय कोरे, हसन मुश्रीफ यांच्यासारखी धडाकेबाज नेत्यांची फळी पाहून कॉँग्रेससह इतर पक्षातील नेत्यांची पक्षात येण्यास रीघ लागायची, पण अलीकडील दहा वर्षांत नेत्यांमधील चढाओढीची स्पर्धा, अंतर्गत कुरघोड्यांमुळे पक्षाला ओहोटी लागली. विनय कोरे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत स्वतंत्र पक्ष काढला. त्यानंतर मंडलिक-मुश्रीफ वादात मंडलिक, नरसिंगराव पाटील, लेमनराव निकम हे पक्षातून बाहेर पडले. खानविलकर यांचा करवीरमधून पराभव झाल्यानंतर त्यांना अपेक्षित बळ न मिळाल्याने त्यांच्याबरोबर ‘करवीर’मधील कार्यकर्त्यांचे खच्चीकरण झाले. व्ही. बी. पाटील, संभाजीराजे, पी. डी. पाटील अशा दिग्गज नेत्यांची गळती लागली तरीही नेत्यांनी अंतर्मुख होऊन विचार केला नसल्याने जिल्हा परिषदेची सत्ता गेली. हातकणंगले, करवीर, शिरोळ तालुक्यांवर ज्या पक्षाची पकड त्याच पक्षाकडे जिल्ह्यातील सत्ताकेंद्रे ताब्यात राहू शकतात,पण राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या तालुक्याकडे दुर्लक्ष केले. नेत्यांनी आपले मतदारसंघापलीकडे बघितलेच नाही. ‘सोयीचे राजकारण’ व कचखाऊ भूमिकेमुळे पक्षाला करवीर, दक्षिण मतदारसंघात उमेदवार देता आला नाही. ‘गोकुळ’च्या निवडणुकीत घेतलेल्या भूमिकेने कार्यकर्त्यांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. आगामी विधानपरिषद निवडणूक, २०१७ होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका पाहिल्या तर पाटील यांना आतापासूनच कामाला लागले पाहिजे. ५कागललाच झुकते माप!जिथे पक्ष सक्षम आहे, तिथेच नेत्यांनी पदांचे वाटप करताना झुकते माप दिले आहे. बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात कागल तालुका अर्धा येतो, तरीही ‘अशासकीय सदस्य’ नियुक्तीत तब्बल तिघांना, तर सर्वांत मोठा असणाऱ्या करवीर तालुक्यातील एकालाच संधी दिली. असे प्रत्येक ठिकाणी नेत्यांनी ‘सोयीचे राजकारण’ केल्याने पक्षवाढीवर मर्यादा आल्या आहेत.