शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

टाकाळा खणीवरून वादंग

By admin | Updated: April 18, 2015 00:07 IST

कार्यकर्त्यांनी काम बंद पाडले : महापालिका राजारामपुरीतील कचरा उठाव बंद करणार

कोल्हापूर : टाकाळा खणीत ‘लॅँडफिल साईट’ (भूमी पुनर्भरण क्षेत्र) कोणत्याही परिस्थितीत १५ मेपूर्वी तयार करा; अन्यथा टोप येथील खणीबाबत वेगळा विचार केला जाईल, असे पुण्यातील हरित लवादाने स्पष्ट केले आहे. मात्र, येथे अशा प्रकारचे क्षेत्र करण्यास राजारामपुरीतील काही कार्यकर्त्यांचा विरोध आहे. यातून गेले आठ ते दहा दिवस हे काम बंद आहे. सोमवारी (दि. २०) हे काम पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासन करणार आहे. यावेळी विरोध झाल्यास सोमवारनंतर राजारामपुरी परिसरातील कचरा उठाव बंद केला जाईल, असा इशारा उपायुक्त अश्विनी वाघमळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला.टाकाळा येथील ११८०/क या ३.२४ आर क्षेत्रातील खणीची जागा बगीचासाठी आरक्षित करण्यात आली आहे. परंतु, त्यापूर्वी याठिकाणी साडेतीन कोटी रुपये खर्चून झूम येथील कचऱ्यावर प्राथमिक प्रक्रिया करून तो कचरा टाकून खण भरण्याची योजना आहे. या खणीमध्ये कचरा टाकण्यापूर्वी थेट कचरा न टाकता फक्त झूम प्रकल्पातील कचऱ्यावर प्राथमिक प्रक्रिया करून उर्वरित ‘रॉ मटेरिअल’च टाकण्याचे बंधन प्रदूषण नियंत्रण मंडळाने घातले आहे. खणीत सध्या असणारे पाणी व जलपर्णी हटवून सभोवती मोठी भिंतही उभारली आहे. अद्याप ५० टक्के भिंत उभारणीचे काम बाकी आहे. दरम्यान, टाकाळा खणीत कचरा टाकण्यास सुरुवात झाल्यानंतरच कचऱ्याच्या प्रश्नातून मुक्तीकडे शहराचे पाऊल पडणार आहे. झूममधील कचरा हटविल्यानंतर याठिकाणी कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प उभा केला जाणार आहे. मात्र, टाकाळा खणीतील योजनेस आंदोलकांमुळे उशीर होत आहे. महापालिकेने थेट कचरा टाकल्यानंतर विरोध करणे योग्य आहे. १० वर्षे जुन्या कचऱ्यातील चाळून झालेले घटक वेगळे केल्यानंतर ते या खणीत टाकले जाणार असल्याने विरोध चुकीचा असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. ‘एमपीसीबी’च्या निकषानुसारच कचरा टाकणारलँडफिल्ड साईटचे काम निम्म्यापेक्षा अधिक झाल्यानंतर होणारा विरोध अनाकलनीय आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) घालून दिलेल्या अटी व निकषानुसार येथे ‘झूम’मधील कचरा टाकला जाणार आहे. असे असताना निव्वळ जर-तरच्या निकषानुसार विरोध चुकीचा असल्याचे उपायुक्त अश्विनी वाघमळे यांनी सांगितले.शास्त्रीय पद्धतीचा वापरखण स्वच्छ केल्यानंतर जमिनीवर प्रदूषण नियंत्रण कायद्याने घालून दिलेल्या निकषांनुसारच शास्त्रीय पद्धतीने कचऱ्याचे घटक बुजविले जाणार आहेत. खणीच्या तळाकडील भागात जाड प्लास्टिकचा थर अंथरला जाणार आहे. यानंतर काही थर कचरासदृश पदार्थ टाकून यावर माती व मुरूम टाकला जाणार आहे. अशा पद्धतीने थर तयार करीतच ही खण बुजविली जाणार असल्याचे मंडळाच्या सूत्रांनी स्पष्ट केले.मागील अनुभव पाहता महापालिका या खणीत प्रक्रिया न करताच कचरा टाकण्याची शक्यता आहे. खण परिसरात १०८ झोपड्या व तीन मोठ्या रुग्णालयांसह दाट लोकवस्ती आहे. शहरातील मध्यवर्ती ठिकाण आहे. प्रक्रिया केलेलाच कचरा टाकणार असल्याची ठाम ग्वाही प्रशासन देत नसल्याने विरोध करीत आहे. विरोधाला विरोध म्हणून नाही. - दुर्गेश लिंग्रस, शिवसेना शहरप्रमुख