शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटदार साजरी करणार काळी दिवाळी, उग्र आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 15:54 IST

goverment, contracter, pwd, kolhapunrnews महाराष्ट्र शासनाने ८ हजार कोटी रुपयांची देयके थकविल्याने कंत्राटदार देशोधडीला लागणार आहेत. त्यामुळेच शासनाच्या या चुकीच्या धोरणांविरोधात काळी दिवाळी साजरी करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाने घेतला आहे. २५ नोव्हेंबरनंतर काम बंद आंदोलन आणि हिवाळी अधिवेशनानंतर उग्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

ठळक मुद्देकंत्राटदार साजरी करणार काळी दिवाळीशासनाकडून ८ हजार कोटी रुपये थकले

कोल्हापूर -महाराष्ट्र शासनाने ८ हजार कोटी रुपयांची देयके थकविल्याने कंत्राटदार देशोधडीला लागणार आहेत. त्यामुळेच शासनाच्या या चुकीच्या धोरणांविरोधात काळी दिवाळी साजरी करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाने घेतला आहे. २५ नोव्हेंबरनंतर काम बंद आंदोलन आणि हिवाळी अधिवेशनानंतर उग्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.महासंघाचे राज्य अध्यक्ष मिलिंद भोसले, कार्याध्यक्ष संजय मैंद, महासचिव सुनील नागराळे यांनी हे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.गेल्या आठ महिन्यांपासून राज्यातील कंत्राटदारांची ही बिले थकीत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे साडेतीन हजार कोटी रुपये, ग्रामविकास विभागाचे ७५० कोटी, नगरविकास विभागाचे २७०० कोटी रुपये, जलसंपदा विभागाचे ६७९ कोटी रुपये थकीत आहेत.

मार्च २०२० नंतर पाठपुरावा सुरू केल्यानंतर शासनाने नोव्हेंबर १९१९ नंतर जून २०२० ला केवळ ५ ते ८ टक्के बिले अदा केली आणि कंत्राटदारांच्या तोंडाला पाने पुसली. महत्त्वाच्या सर्व मंत्र्यांना याबाबत १६ विनंतीपत्रे पाठविली आहेत एकीकडे आमची देणी दिलेली नसताना दुसरीकडे केवळ आर्थिक वसुलीसाठी ठराविक मोठ्या कंपन्यांच्या कामांना मात्र निधी दिला जात आहे, असा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.कोरोना नसल्यापासूनची ही बिले असून कोरोनाचे कारण सांगून कंत्राटदारांची दिशाभूल केली जात असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलनाचा इशारादिवाळीपूर्वी जर बिले दिली नाहीत तर राज्यभर २५ नोव्हेंबरपासून पहिल्यांदा स्थानिक पातळीवर काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे. त्यानंतर शासकीय कार्यालयांना कुलपे ठोकण्यात येणार असून मंत्र्यांच्या घरांसमोर आंदोलन करण्यात येणार आहे. त्यानंतरही जर बिले मिळाली नाही तर मात्र उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा पत्रकातून देण्यात आला आहे.

टॅग्स :Diwaliदिवाळीpwdसार्वजनिक बांधकाम विभागkolhapurकोल्हापूर