शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
3
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
4
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
5
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
6
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
7
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
8
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
9
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
10
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
11
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
12
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
13
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
14
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
15
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
16
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
17
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
18
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
19
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
20
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!

ठेकेदार, बांधकाम विभागाचा वेळकाढूपणा

By admin | Updated: April 23, 2015 01:04 IST

तमदलगे-अंकली चौपदरीकरण रस्ता : रस्त्यामुळे नागरिकांना सोसाव्या लागताहेत मरणयातना; लोकप्रतिनिधी लक्ष देणार का?

जयसिंगपूर : सांगली-कोल्हापूर चौपदरीकरणांतर्गत तमदलगे बसवान खिंड ते अंकली टोलनाका दरम्यानच्या रस्ताप्रश्नी ‘लोकमत’ने आवाज उठविल्यानंतर या भागातील नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. घरांचे पुनर्वसन, शेतकऱ्यांची नुकसान भरपाई, रस्त्याचे अर्धवट काम, निमशिरगावच्या पर्यायी शाळेचे नियोजन याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार कंपनी कुचकामी असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या. केवळ वेळकाढूपणा अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. गेली तीन वर्षे या रस्त्यावरून नागरिकांना मरणयातना सोसाव्या लागत आहेत. लोकप्रतिनिधींनाया प्रश्नाचे कसलेही सोयरसुतक नाही, अशा भावनाही व्यक्त करण्यात आल्या.दरम्यान, निमशिरगाव (ता. शिरोळ) येथील कुमार व कन्या विद्यामंदिर या दोन्ही शाळांच्या इमारती चौपदरीकरणांतर्गत जात असल्याने गेल्या दोन वर्षांपासून पर्यायी बांधकामाचा निर्णय झालेला नाही. ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्यावतीने वेळोवेळी निवेदने देऊनही त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. शाळेची इमारत मोडकळीस आली असून, ती कोणत्याही क्षणी कोसळण्याच्या स्थितीत आहे. सुमारे चारशे विद्यार्थ्यांना धोकादायक बनलेल्या इमारतीचे पर्यायी जागेत बांधकाम करून देणे गरजेचे आहे. पर्यायी जागा मोजणीबाबतचा प्रस्ताव भूमापन कार्यालयात प्रलंबित आहे. येत्या जूनमध्ये शाळा भरवायची कोठे, हा प्रश्न गंभीर बनला असून, याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा २७ मे २०१५ला ग्रामपंचायत व शालेय व्यवस्थापन समितीच्यावतीने जुन्या सांगली-कोल्हापूर मार्गावर रास्ता रोको आंदोलनाचा इशारा शालेय व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायतीने निवेदनाद्वारे दिला आहे. (प्रतिनिधी)निमशिरगावमध्ये काम थांबविलेया शेतकऱ्यांच्या जमिनीतील मुरूम रस्त्यासाठी नेण्यात आला, त्या मुरुमाऐवजी माती टाकण्याचे आश्वासन ठेकेदार कंपनीने दिले होते. मात्र, अद्यापही शेतकऱ्यांना माती मिळालेली नाही. या कारणातून निमशिरगाव ग्रामपंचायतीने गावातील रस्त्याचे काम थांबविले आहे. शेतकऱ्यांची नुकसानभरपाई, शाळा इमारतीचे बांधकाम जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत रस्त्याचे काम सुरू करू देणार नाही, अशा आशयाचे निवेदन ग्रामपंचायतीने जिल्हाधिकारी यांना पाठविले आहे.सुप्रिम कंपनीने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्याकडे तक्रारी देऊनही या भागातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळालेली नाही. केवळ हुकूमशाही पद्धतीने चौपदरीकरण रस्त्याचे काम सुरू आहे. आधी लोकांना पर्यायी जागा द्या, मगच रस्ता करा, अन्यथा आंदोलन करू.- सुरेश कांबळे, दानोळी जि. प. सदस्यदुपदरीकरण रस्ता करीत असताना रस्त्याचे नियोजन शून्य झाले आहे. वास्तविक रस्ता तयार करीत असताना रस्त्याची एक बाजू तयार केल्यानंतरच दुसरी बाजू उखडणे गरजेचे होते. मात्र, याठिकाणी संपूर्ण रस्ताच उखडण्यात आल्याने नागरिकांना नाहक त्रासास सामोरे जावे लागत आहे. खासदार, आमदार या प्रश्नाकडे लक्ष देणार का ?- नीळकंठ राजमाने, जैनापूर ग्रामस्थशासनाकडून शेतकरी व ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले आहे. रस्त्यात येणारी शेतजमीन, घरे यांना कवडीमोल दराने मोबदला दिला जात आहे. शासनाने भूमी अधिग्रहण कायद्याप्रमाणे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी. लोकप्रतिनिधींना या प्रश्नाचे कसलेच सोयरसुतक नाही. - विक्रम पाटील, जैनापूर ग्रामस्थतमदलगे येथे सुमारे ३५ घरांचा प्रश्न न सुटल्यामुळे या लोकांनी जायचे कोठे? हा प्रश्न गंभीर आहे. केवळ सातबारा पत्रकी भूमी अधिग्रहण करून अधिकाऱ्यांनी कागदोपत्री मेळ घातला आहे. पर्यायी जागा दिल्यानंतरच घरे सोडण्यात येतील. याबाबत लवकरच एक शिष्टमंडळ घेऊन पालकमंत्र्यांना भेटणार आहे.- पिरगोंडा पाटील, सरपंच, तमदलगेचिपरी-जैनापूर खराब रस्त्याबाबत सुप्रिम कंपनीकडे माहिती घेतली असता, हा रस्ता आमच्याकडे अजून वर्ग होणार असल्याचे सांगण्यात आले. तर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे चौकशी केली असता चौपदरीकरणांतर्गत हा रस्ता होणार असल्याचे सांगण्यात आल्यामुळे ग्रामपंचायतीकडून आम्हाला मुरूम टाकण्यात अडचणी होत आहेत. खासदार व आमदार यांच्याकडेही हा प्रश्न मांडला आहे. - सुदर्शन पाटील, चिपरी, सरपंच