शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
3
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
4
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
5
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
6
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
7
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
8
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
9
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
10
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
11
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
13
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
14
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
15
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
16
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
17
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
18
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
19
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
20
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
Daily Top 2Weekly Top 5

ठेकेदारांपासून ‘रावसाहेबां’पर्यंत ‘मालामाल’

By admin | Updated: June 30, 2015 00:47 IST

पाणी योजनेनंतर आर्थिक प्रगती : चारचाकी दारात, तालुक्याच्या ठिकाणी फ्लॅट खरेदी

भीमगोंडा देसाई - कोल्हापूर -पाणी योजनेतील भ्रष्टाचार कमी करण्यासाठी गावपातळीवरील विविध समित्या व ग्रामस्थांना जादा अधिकार दिले. मात्र, भ्रष्टाचार थांबण्याऐवजी गावपातळीवरील भ्रष्ट सरपंच, ठेकेदार, शासकीय यंत्रणेतील ‘रावसाहेबां’पर्यंत मालामाल होऊ लागले आहेत. योजना पूर्ण होताच अंमलबजावणीत महत्त्वाची भूमिका बजावलेल्यांची आर्थिक परिस्थिती विलक्षण सुधारत आहे. त्यांच्या दारासमोर दहा लाखांपर्यंतची चारचाकी येते, तर तालुक्याच्या ठिकाणी ते फ्लॅटचे मालक बनत आहेत. शासकीय यंत्रणेद्वारे पाणी योजनांची अंमलबजावणी केल्यास भ्रष्टाचार होतो आणि मंजूर निधीतील पै आणि पै पारदर्शकपणे खर्च केले जात नाहीत, असे निदर्शनास आले. त्यामुळे शासनानेच गावपातळीवर गावसभेत चर्चा होऊन स्थापन झालेल्या ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता समिती अध्यक्ष, महिला विकास समिती, सामाजिक लेखापरीक्षण समिती, ग्रामीण नळ पाणीपुरवठा समिती यांना योजनेची अंमलबजावणी व देखरेखीचे अधिकार दिले.मात्र, गावसभा कागदावरच दाखवून ग्रामपंचायतीमधील सत्ताधारी, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आमदार यांच्या मर्जीतील कार्यकर्त्यांचा समावेश या समितीमध्ये केला जातो. यामुळे अनेक गावांत समिती नियुक्तीवरूनचे वाद न्यायालयातही गेले आहेत. समिती स्थापन झाल्यानंतर प्रत्यक्षात अंमलबजावणी ठेकेदार आणि संबंधित जिल्हा परिषदेचे अभियंताच करत असतात. मलिदा घरपोच झाल्यानंतर पाणी योजनेचे काम चांगले झाले आहे की नाही, हे न पाहताच समितीचे अध्यक्ष, सदस्य सही करतात. अनेक ठेकेदार विविध समित्यांचे अध्यक्ष, सरपंच यांचे चेकबुक, शिक्के आपल्या बॅगेत घेऊन फिरतात. चेकवर आधीच सही करून घेतली असल्यामुळे हव्या त्यावेळी ते पैसे काढतात अन् खर्चही करतात. योजना पूर्ण झाल्यानंतर एक वर्षानंतर ठेकेदार देखभाल व दुरुस्तीसाठी ती ग्रामपंचायतीकडे वर्ग करीत असतो. यावेळी गैरव्यवहार करून निकृष्ट काम झाले असल्यास संबंधित गावच्या सरपंच, ग्रामसेवक यांनाही ‘पाकीट’ दिले जाते. त्यामुळे बहुतांश वेळी योजना पूर्ण होण्याआधीच ठेकेदार पूर्णत्वाचा दाखल घेतात. शासनाचे पैसे खात्यावरून काढताना प्रत्यक्ष काम झाले आहे किंवा नाही, झालेले काम आराखड्यानुसार आहे किंवा नाही, याची खातरजमा करण्याची जबाबदारी शासकीय अधिकारी, संबंधित अभियंत्याची असते. मात्र, अभियंत्याचेही ‘हात ओले’ झाले की, न पाहताच सर्व काही मंजूर केले जाते. (क्रमश:)ढपल्याची पद्धत काय?प्रत्येक योजनेत पाणी उपसण्यासाठी दोन विद्युतपंप घेणे बंधनकारक आहे. आराखड्यात तशी तरतूदही असते. मात्र, एकच विद्युतपंप बसवून दुसऱ्या पंपाचे पैसे लाटले जातात. नियमानुसार किती जाडीचे पाईप्स वापरायला हवे, तितके वापरले जात नाही. त्यामुळे कमी जाडीचे, हलक्या दर्जाचे पाईप्स वापरून एका पाईपमागे कमीकमीत दोन हजार रुपयांचा ढपला पाडला जातो. तसेच अनेक ठिकाणी जुन्याच पाणी योजनेचे जॅकवेल नव्या योजनेत पुन्हा दाखविले जाते.गावांत योजना पूर्णआजरा९भुदरगड१६चंदगड२०गडहिंग्लज१२गगनबावडा६हातकणंगले२०कागल५करवीर२५पन्हाळा२३राधानगरी२९शाहूवाडी१७शिरोळ ४४