शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

४३ जणांच्या चौकशीसाठी कंत्राटी अधिकारी--महापालिका :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 00:56 IST

समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : महापालिकेतील अनेक अधिकारी आणि कर्मचारी यांची चौकशी करण्यासाठी अधिकारी कमी पडत असल्याने आता तीन निवृत्त तहसीलदारांमार्फत चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या ४३ अधिकारी, कर्मचाºयांची चौकशी प्रलंबित असून त्यांची युद्धपातळीवर चौकशी करून कारवाईची प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे.कोल्हापूर महापालिकेतील विविध विभागांतील कारभार हा ...

ठळक मुद्देअतिरिक्त कार्यभारामुळे निर्णय; तीन निवृत्त तहसीलदारांची नियुक्तीशासन नियमानुसार एका चौकशी प्रकरणाला ठरावीक मानधन देण्यात येणार

समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : महापालिकेतील अनेक अधिकारी आणि कर्मचारी यांची चौकशी करण्यासाठी अधिकारी कमी पडत असल्याने आता तीन निवृत्त तहसीलदारांमार्फत चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या ४३ अधिकारी, कर्मचाºयांची चौकशी प्रलंबित असून त्यांची युद्धपातळीवर चौकशी करून कारवाईची प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे.

कोल्हापूर महापालिकेतील विविध विभागांतील कारभार हा नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. कधी पदाधिकारी, नगरसेवकांच्या दबावामुळे, तर कधी हात मारण्याच्या वृत्तीमुळे विविध विभागांमध्ये अनेक घोटाळे झाल्याचे उघडकीस आले आहे. केएमटीतील घोटाळा, कंटनेर घोटाळा, टीडीआर घोटाळा असे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. यामध्ये काही अधिकारी आणि कर्मचारी, शिपाईही सकृत्दर्शनी दोषी असल्याचे दिसून आल्याने त्यांची चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये काही डॉक्टरांचाही समावेश आहे. वर्ग १ च्या अधिकाºयांचीही यात नावे आहेत.परंतु महापालिकेचा वाढता व्याप, अपुरे पडणारे मनुष्यबळ यांमुळे एकीकडे दैनंदिन कामकाज पार पाडण्यावर मर्यादा येत असताना दुसरीकडे ४३ अधिकारी, कर्मचाºयांची चौकशीची प्रकरणे प्रलंबित पडली आहेत. घोटाळे होऊन त्यांवर सर्वसाधारण सभांमध्ये खडाजंगी झाली तरी वेळेत चौकशी न झाल्याने नगरसेवकांनी अनेक वेळा प्रशासनावर तोफ डागली आहे. यावर तोडगा म्हणून आता निवृत्त तीन तहसीलदारांचे पॅनेल तयार करण्यात येणार असून, त्यांना ही प्रकरणे वाटून देण्यात येणार आहेत. त्यांच्याकडून चौकशीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाईचा निर्णय घेण्यात येणार आहे.तीन महिन्यांत अहवाल देणे बंधनकारकया कामासाठी इच्छुक माजी तहसीलदारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. १ जुलै २०१७ रोजी उमेदवाराचे वय ७० वर्षांपेक्षा अधिक नसावे अशी मुख्य अट आहे. चौकशी अधिकारी हा शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याचा जिल्हा शल्यचिकि त्सक यांचा दाखला सक्तीचा असून, चौकशीत व्यत्यय होईल अशा कोणत्याही व्यावसायिक कामात किंवा सेवेत हा अधिकारी गुंतलेला नसावा, अशी अपेक्षा आहे. शासन नियमानुसार एका चौकशी प्रकरणाला ठरावीक मानधन देण्यात येणार असून, प्रकरण सोपविल्यानंतर तीन महिन्यांत चौकशी अहवाल देणे बंधनकारक आहे.वाईटपणा घेण्याची तयारी हवीएकूणच, कोल्हापूर महापालिकेतील घोटाळ्यांचे स्वरूप पाहता यातील अनेक प्रकरणे ही केवळ अधिकारी, कर्मचाºयांनी केली आहेत असे नव्हे; तर त्यांना अभय देणारेही काही लोकप्रतिनिधी आहेत. एकमेकांना सांभाळून घेत अनेक घोटाळे महापालिकेत होत असल्याने चौकशी करून वाईटपणा घेण्यासाठी कितीजण तयार होतील, हा एक औत्सुक्याचा विषय आहे.