सांगली : जिल्हा परिषद अध्यक्षा स्नेहल पाटील यांच्या येळावी गावातील पिण्याच्या पाण्याचे नमुने दूषित आल्याने गुरुवारी एकच खळबळ उडाली. अध्यक्षांच्या गावासह जिल्ह्यातील ६७ गावांमध्ये दूषित पाणी आढळले आहे. या सर्व गावांना तात्काळ स्वच्छ पाणी पुरवठा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून प्रत्येक महिन्याला जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याची तपासणी करण्यात येते. आॅक्टोबरमध्ये जिल्ह्यातील २०४८ पाणी नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. यापैकी ८६ नमुने दूषित आढळले. वाळवा तालुक्यातील सर्वाधिक गावात दूषित पाणी नमुने आढळले आहेत, तर सर्वात कमी संख्या कवठेमहांकाळ तालुक्यात आहे. दूषित पाणी नमुने आढळलेली गावे पुढीलप्रमाणे - आटपाडी तालुका- खरसुंडी, नेलकरंजी, कामत, दिघंची, लेंगरेवाडी, पुजारवाडी, पात्रेवाडी. जत तालुका - रेवनाळ व डोर्ली. कवठेमहांकाळ तालुका- लांडगेवाडी तलाव. मिरज तालुका - खंडेराजुरी, पायाप्पाचीवाडी, आरग, बेडग, शिंंदेवाडी, लिंंगनूर. तासगाव तालुका - पेड, बेंद्री, येळावी, नागाव, जुळेवाडी, कुमठे, मणेराजुरी, गव्हाण, उपळावी. पलूस तालुका - बांबवडे, दुधोंडी, आंधळी, सावंतपूर, कुंडल, घोगाव, दह्यारी. वाळवा तालुका - खरातवाडी, ढवळी, बनेवाडी, साखराळे, ताकारी, मिरजवाडी, कारंदवाडी, मर्दवाडी, गोटखिंंडी, नागाव, पोखर्णी, भवानीनगर, शिरटे, वाळवा व शिगाव. शिराळा तालुका - बिऊर, उपवळे, शिराळा, खेड, तडवळे, माळेवाडी, अस्वलेवाडी. खानापूर तालुका - मांगरूळ, चिंंचणी, घोडी बु., जाधववाडी, ऐनवाडी, पळशी, बाणूरगड, खानापूर, धोंडेवाडी, भडकेवाडी. कडेगाव तालुका - बेलवडे, उ. मायणी, सासपडे. (प्रतिनिधी)निकृष्ट टीसीएलजिल्ह्यातील ४०६ ठिकाणच्या टीसीएल पावडरचे नमुने तपासण्यात आले होते. यामध्ये क्लोरिनचे प्रमाण वीस टक्क्यापेक्षा कमी असलेल्या नमुन्यांची संख्या १३ आहे. निकृष्ट टीसीएलचे सर्व नमुने जत तालुक्यातील आहेत. यामध्ये सिंदूर, मेंढेगिरी, रावळगुंडवाडी, बसर्गी, मोटेवाडी, अंकलगी, तिल्याळ, कुंभारी, उटगी, बालगाव, हळ्ळी, पायाप्पाचीवाडी, डोंगरवाडी या गावांचा समावेश आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षांच्या गावातच आढळले दूषित पाणी
By admin | Updated: November 11, 2016 00:13 IST