शहरं
Join us  
Trending Stories
1
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
2
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
3
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
4
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
5
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
6
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
7
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!
8
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप
9
निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत निघणार विराट मोर्चा; सर्वपक्षीय विरोधकांची घोषणा
10
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियानं पर्थच्या मैदानात जिंकला पहिला सामना
11
Viral Video: छोटा पॅकेट, बडा धमाका !! चिमुरडीने केला अफलातून डान्स, नेटकऱ्यांची जिंकली मनं
12
दिवाळीपूर्वी बाजारात 'लक्ष्मी दर्शन'! टॉप १० कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये २.१६ लाख कोटींची वाढ, सर्वाधिक कुठे?
13
लव्ह ट्रँगलचा भयंकर शेवट! माजी लिव्ह-इन पार्टनरने केली गर्भवतीची हत्या, पतीने घेतला आरोपीचा जीव
14
जियोफायनान्सकडून डिजिटल गोल्ड खरेदीवर २% सोने मोफत; सोबत १० लाख रुपयांपर्यंतची बक्षिसेही
15
Mitchell Starc Bowling Speed : स्टार्कनं खरंच रोहितला 'वर्ल्ड रेकॉर्ड' सेट करणारा वेगवान चेंडू टाकला?
16
सोमवारी बँक सुरू की बंद? दिवाळीच्या दिवशी बँकेत जाण्यापूर्वी RBI ची सुट्टीची यादी नक्की तपासा!
17
IND vs AUS 1st ODI : गिलनं साधला मोठा डाव! महेंद्र सिंह धोनीचा कॅप्टन्सीतील रेकॉर्ड मोडला
18
Parineeti Chopra : परिणीती चोप्रा-राघव चड्ढा झाले आईबाबा, अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्याचे आगमन
19
संतापजनक! अमृत भारत एक्स्प्रेसमध्ये वापरलेल्या प्लेट्स धुवून दिलं जेवण, प्रवाशांच्या जीवाशी खेळ
20
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियानं केल्या १३६ धावा, पण ऑस्ट्रेलियाला मिळालं १३१ धावांचं टार्गेट; कारण...

कांद्याबरोबर तेलाच्या फोडणीचा ग्राहकांना चटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 15:45 IST

गेली महिना-दीड महिना कांद्याने ग्राहकांच्या डोळ्यांत पाणी आणले असताना, आता सरकी तेलाचा चटका सहन करावा लागत आहे. किरकोळ बाजारात सरकी तेलाचा दर प्रतिकिलो ९४ रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या आठवड्याभरात भाजीपाल्याच्या दरात काही प्रमाणात घसरण झाली असून, वांगी २० रुपये किलोपर्यंत खाली आली आहेत.

ठळक मुद्देसरकी तेलाची शंभरीकडे वाटचाल भाजीपाल्याच्या दरात मात्र घसरण

कोल्हापूर : गेली महिना-दीड महिना कांद्याने ग्राहकांच्या डोळ्यांत पाणी आणले असताना, आता सरकी तेलाचा चटका सहन करावा लागत आहे. किरकोळ बाजारात सरकी तेलाचा दर प्रतिकिलो ९४ रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या आठवड्याभरात भाजीपाल्याच्या दरात काही प्रमाणात घसरण झाली असून, वांगी २० रुपये किलोपर्यंत खाली आली आहेत.कांद्याने १५0 रुपये पार केल्याने स्वयंपाकातून कांदाच गायब झाला आहे. घाऊक बाजारात २० ते १५० रुपये प्रतिकिलो कांदा असला, तरी किरकोळ बाजारात ५० पासून पुढे कांद्याचा दर आहे. खराब कांदा ५० रुपयांनी घेण्याची वेळ ग्राहकांवर आली आहे. एक नंबर प्रतीच्या कांद्याला हात लावता येत नाही. बटाट्याचे दर मात्र स्थिर असून, २० रुपये किलो दर कायम राहिला आहे.

महापूर आणि त्यानंतर झालेल्या परतीच्या पावसाने सोयाबीनसह इतर तेलबियांची पिके उद्ध्वस्त झाली आहेत. त्याचा परिणाम सध्या दिसत असून, सरकी तेलाच्या दरात वाढ झालेली आहे. गेल्या आठवड्यात किरकोळ बाजारात ८८ रुपये किलो असणारे तेल आता ९४ रुपयांवर पोहोचला असून, शंभरीकडे वाटचाल सुरू केली आहे. साखर ३८ रुपयांवर स्थिर असून, तूरडाळ १००, मूग डाळ १००, मूग ८८, मटकी १२० रुपये किलो आहे. ज्वारीच्या दरात वाढ होऊ लागली असून, प्रतिकिलो ४० रुपयांच्या पुढे दर पोहोचला आहे.भाजीपाल्याचे दर आवाक्यात आले असून, किरकोळ बाजारात ८० रुपये किलोवर पोहोचलेल्या भाज्या ४० रुपयांवर आल्या आहेत. वांग्याचा दर ४० ते ६० रुपये किलो होता. तो आता २० ते ३० रुपयांवर खाली आला आहे. गवार ४० रुपये, ओला वाटाणा ५०, तर वरणा ४० रुपये किलो आहे. दोडका, ढब्बू, कोबीचे दर स्थिर आहेत. टोमॅटोच्या दरात घसरण झाली असून, बाजार समितीत रोज तीन हजार कॅरेटची आवक होते. हरभरा पेंढीबरोबरच हरभरा भाजीची आवकही वाढली आहे.कोथिंबिरीच्या दरात घसरणगेले महिनाभर कोथिंबिरीचा दर ५० रुपये पेंढीपर्यंत गेला होता. आता आवक वाढली असून, रविवारी बाजार समितीत २५ हजार पेंढ्यांची आवक झाल्याने दर घसरले. सध्या १0 रुपये पेंढी दर राहिला.

 

गेल्या चार-पाच वर्षांत सरकी तेलाच्या दरात एवढी वाढ पहिल्यांदाच झाली आहे. कांद्यासह डाळीचे दरही तेजीत असल्याने एकूणच व्यवसायावर परिणाम झाला आहे.- संजय नाकील,व्यापारी

 

 

टॅग्स :Marketबाजारkolhapurकोल्हापूर