शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
2
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
5
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
6
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
7
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
8
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
9
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
10
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
11
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
12
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
13
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
14
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
15
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
16
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
17
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
18
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
19
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
20
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश

बांधकाम व्यावसायिक अमृतलाल शहा यांना अटक

By admin | Updated: April 25, 2016 00:56 IST

धनादेश न वटल्याप्रकरणी पोलिसांची कारवाई

कोल्हापूर : चिकोडी (जि. बेळगाव) येथील एका बँकेच्या थकीत कर्जप्रकरणी धनादेश न वटल्याप्रकरणी वारंवार समन्स बजावूनही हजर न झाल्याने चिकोडी-बेळगाव न्यायालयाने काढलेल्या वॉरंटनुसार जुना राजवाडा पोलिसांनी कोल्हापुरातील आशापूरम डेव्हलपर्सचे बांधकाम व्यावसायिक अमृतलाल खेतमल शहा (वय ५१, रा. भक्तिपूजा नगर) यांना रविवारी अटक केली. आशापूरम डेव्हलपर्सचे अमृतलाल शहा यांनी कर्नाटकपाठोपाठ कोल्हापुरातही हॉकी स्टेडियमसमोरील ७०९ अ येथील समावेशक आरक्षणातील ९०८.५० चौरस मीटर क्षेत्राचे देय असणारे बांधीव कार्यालय, दुकानगाळे महानगरपालिका प्रशासनास मुदतीत दिले नाहीत म्हणून महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी ५२ लाख ६५ हजार ६६६ रुपयांचा दंड केला आहे. शहा यांनी कोल्हापुरासह कर्नाटकात जागा विकसित केल्या आहेत. कर्नाटकातील काही बँकांकडून घेतलेल्या कर्जप्रकरणातील रकमेचा धनादेश न वटल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात चिकोडी न्यायालयात खटला दाखल आहे. न्यायालयाने त्यांना हजर राहण्यासाठी वारंवार समन्स पाठवूनही त्यांनी दुर्लक्ष केले. या प्रकरणी न्यायालयाने त्यांना अटक वॉरंट काढून जुना राजवाडा पोलिसांना आदेश दिले होते. त्यानुसार रविवारी त्यांना अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांना आज, सोमवारी चिकोडी पोलिसांच्या ताब्यात देऊन न्यायालयात हजर केले जाणार आहे. शहा यांनी महापालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी महिला व बालकल्याण समिती सभापती वृषाली कदम, नगरसेवक भूपाल शेटे यांनी मनपा आयुक्त शिवशंकर यांच्याकडे तक्रार करून समावेशक आरक्षणातील बांधकामाचा विषय उपस्थित केला होता. त्यानुसार आयुक्त शिवशंकर, सहायक संचालक नगररचना धनंजय खोत यांनी हॉकी स्टेडियमसमोरील रि.स. नं. ७०९ अ या मिळकतीची पाहणी केली आणि तक्रारीतील मुद्दे योग्य असल्याचे पाहून शहा यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे. (प्रतिनिधी)शहा भांबावून गेले बांधकाम व्यावसायिक अमृतलाल शहा यांना पोलिसांनी रविवारी दुपारी अटक केली. त्यांना पोलिस ठाण्यातील कोठडीमध्ये ठेवले. आलिशान बंगल्यात राहणाऱ्या शहा यांनी दिवसभर कोठडीमध्येच ताणून दिले. त्यानंतर त्यांना राजारामपुरी पोलिस ठाण्याच्या कोठडीमध्ये पोलिस घेऊन निघाल्यावर त्यांचे छायाचित्र काढण्यासाठी छायाचित्रकार पुढे सरसावले असता ते भांबावून गेले. पोलिसांना सोडून ते तोंड लपवत धावत बाहेर निघाले. यावेळी पोलिसांनी त्यांची चांगलीच खरडपट्टी केली. त्यानंतर तोंडाला रूमाल बांधून ते पोलिस व्हॅनमध्ये बसले.