शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम विभाग ‘असून अडचण नसून खोळंबा!’ : कुरुंदवाड पालिकेतील चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 21:24 IST

कुरुंदवाड : पालिकेत बांधकाम विभागाला अनन्यसाधारण महत्त्व असते. येथील बांधकाम सभापतिपदी एका महाविद्यालयाचे उपप्राचार्य व अभ्यासू व्यक्तिमत्त्व असलेले नगरसेवक प्रा. सुनील चव्हाण आहेत.

ठळक मुद्देबांधकाम सभापतींना स्वतंत्र कक्षच नाही

गणपती कोळी।कुरुंदवाड : पालिकेत बांधकाम विभागाला अनन्यसाधारण महत्त्व असते. येथील बांधकाम सभापतिपदी एका महाविद्यालयाचे उपप्राचार्य व अभ्यासू व्यक्तिमत्त्व असलेले नगरसेवक प्रा. सुनील चव्हाण आहेत. मात्र, गेल्या सहा महिन्यांत त्यांना स्वतंत्र कक्ष मिळालेले नाहीत. सहा महिन्यांपासून बांधकाम विभागाकडील कनिष्ठ अभियंतापद प्रभारी राहिले आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या पदाला पालिकेने महत्त्वच कमी केले असून, बांधकाम विभागाची ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशीच कुरुंदवाडची अवस्था आहे.

पालिका क्षेत्रात बांधकाम विभागाला विशेष महत्त्व असते. या समितीचे केवळ सभापतिपदच नव्हे, तर समिती सदस्य होण्यासाठीही नगरसेवक प्रतिष्ठा पणाला लावतात. शहराची विकासाची अर्थवाहिनी मानल्या जाणाऱ्या या विभागात टक्केवारीत व्यवहार चालत असल्याने बांधकाम विभाग मिळण्यासाठी मोठे राजकारण चालते.अशा महत्त्वाच्या खात्याचे येथील पालिकेमध्ये मात्र खच्चीकरणच केले जात असल्याचे बोलले जात आहे. पालिकेच्या स्थापनेपासून या विभागाच्या सभापतीला स्वतंत्र कक्ष आहेत. शहराच्या बांधकाम विभागासाठी कनिष्ठ अभियंतापद असून, एक स्वतंत्र अधिकारी आहे.

जानेवारीमध्ये समित्या निवडी झाल्या. बांधकाम विभागावरच शहराच्या विकासाचे चित्र ठरू शकते. यामुळे नगराध्यक्ष जयराम पाटील यांनी एका महाविद्यालयाचे उपप्राचार्य, अभ्यासू तसेच नवीन विकासाचा दृष्टिकोन व तळमळ असणारे प्रा. सुनील चव्हाण यांना सभापतिपद दिले. त्यांच्यावर जबाबदारी दिल्याने शहरवासीयांच्या अपेक्षा उंचावल्या. मात्र, पालिका स्थापनेपासून या विभागाला स्वतंत्र कक्ष असताना प्रा. चव्हाण यांना स्वतंत्र कक्ष अद्याप मिळालेला नाही.

या विभागाचे कनिष्ठ अभियंता पद गेल्या सहा महिन्यांपासून रिक्त असून, प्रभारी अधिकाºयांवर कारभार चालविला जातो. आठवड्यातून दोन दिवस येणाºया या अधिकाºयांमुळे शहराच्या विकासालाच ‘खो’ बसला आहे. त्यामुळे या विभागाचे महत्त्वच कमी झाले आहे. या पदावर कार्यक्षम सभापती असताना अधिकार आणि अधिकाºयाविना खच्चीकरण केले जात असल्याची चर्चा असून, या प्रकाराने पालिकेच्या बांधकाम विभागाची ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशीच स्थिती झाली आहे.पूर्णवेळ बांधकाम अभियंत्याची गरजशहराच्या विकासाची अर्थवाहिनी असणाºया बांधकाम विभागाचा दररोज आढावा घेणे, बैठका घेण्यासाठी स्वतंत्र कक्ष हवा. तसेच पूर्णवेळ बांधकाम अभियंता असणे गरजेचे आहे. तरच शहराच्या विकासाला गती मिळू शकते.२५ वर्षे बांधकाम सभापतिपदशहराचे माजी नगराध्यक्ष स्व. गणपतराव पोमाजे सलग पंचवीस वर्षे बांधकाम सभापतिपद आपल्याकडे होते. स्वतंत्र कक्षाबरोबर या विभागावर त्यांचा दबदबा होता.त्यामुळे पालिकेचा कोणताही निर्णय यांच्या मान्यतेशिवाय पुढे सरकत नसे. त्यामुळे पालिकेत लोकप्रतिनिधींचे महत्त्व त्यांनी वाढविले होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरpwdसार्वजनिक बांधकाम विभाग