शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

साडेतीन लाख चौरस फूट बांधकाम पाडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 01:09 IST

कोल्हापूर : तावडे हॉटेल ते गांधीनगर रस्त्यावरील महापालिकेच्या मालकीचे नव्हे; परंतु महापालिकेच्या हद्दीत झालेल्या १९ अनधिकृत इमारतींचे साडेतीन लाख चौरस फूट बांधकाम आहे. या बांधकामांवर कोणत्याही क्षणी हातोडा घालण्याची प्रक्रिया महापालिकेने शुक्रवारी सुरू केली. मात्र, या कारवाईसाठी पोलीस बंदोबस्त मिळाल्यानंतरच प्रत्यक्ष कृती होणार आहे.शहराच्या पूर्वेकडील भागात असलेल्या तावडे हॉटेल ते ...

कोल्हापूर : तावडे हॉटेल ते गांधीनगर रस्त्यावरील महापालिकेच्या मालकीचे नव्हे; परंतु महापालिकेच्या हद्दीत झालेल्या १९ अनधिकृत इमारतींचे साडेतीन लाख चौरस फूट बांधकाम आहे. या बांधकामांवर कोणत्याही क्षणी हातोडा घालण्याची प्रक्रिया महापालिकेने शुक्रवारी सुरू केली. मात्र, या कारवाईसाठी पोलीस बंदोबस्त मिळाल्यानंतरच प्रत्यक्ष कृती होणार आहे.शहराच्या पूर्वेकडील भागात असलेल्या तावडे हॉटेल ते गांधीनगर रस्त्यावरील निगडेवाडीपर्यंतची हद्द महानगरपालिकेची की उचगाव ग्रामपंचायतीची यावरून गेली काही वर्षे वाद सुरू होता. प्रकरण उच्च न्यायालयापर्यंत गेले. न्यायालयाने राज्य सरकारच्या नगरविकास विभागास नागरिकांच्या हरकती घेऊन ही हद्द कोणाची, याचा निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर शासनाने प्रतिज्ञापत्र सादर करून सर्व कागदपत्रे, पुरावे लक्षात घेता ही जागा महानगरपालिकेच्या मालकीची असल्याचे सांगितले. न्यायालयात सन २०१४ ला यासंदर्भात याचिका दाखल झाली होती. त्यामुळे जागेची मालकी महापालिकेची असल्याचा निर्वाळा देतानाच न्यायालयाने सन २०१४ नंतरच्या बेकायदेशीर इमारती तोडण्यास हरकत नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे अशा १९ इमारती महानगरपालिकेच्या ‘हिट लिस्ट’वर आल्या. यातील तब्बल ८ इमारती न्यायालयाच्या सन २०१४ च्या स्थगिती आदेशानंतर बांधल्या आहेत. खरंतर हा न्यायालयाचा अवमानच आहे. ही बाबही न्यायालयाच्या निदर्शनास यापूर्वीच आणून दिली आहे. याशिवाय जी जागा रिकामी होती ती महापालिकेच्या इस्टेट विभागाने ताब्यात घेतली असून तिथे महापालिकेच्या हद्दीचा फलक लावण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.महापालिका काय करणार..महापालिकेने या बांधकामांवर कारवाई करण्यासंबंधीची एमआरटीपी कायद्याच्या ‘५३-ए’ अन्वये दिलेल्या नोटिसांची मुदत संपलेली आहे. या १९ बांधकामप्रकरणी महापालिकेने न्यायालयात कॅव्हेटही दाखल करून ठेवली आहेत. त्यामुळे आता नव्याने नोटिसा काढण्याची गरज नाही. आता होईल ती थेट कारवाईच. यात बांधकामे जमीनदोस्त करणे किंवा त्यांच्या मालकांविरुद्ध गुन्हे दाखल करणे या दोन्ही कारवाई होऊ शकतात, अशी माहिती आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी पत्रकारांना दिली. ती नियमित करण्याचा शासनस्तरावर प्रयत्न होऊ शकतो का, या प्रश्नावर आयुक्तांनी ‘नो कॉमेंटस्’ असे उत्तर दिले.२५० एकर क्षेत्रतावडे हॉटेल ते गांधीनगर परिसरातील हे वादग्रस्त क्षेत्र २५० एकर आहे. त्यामध्ये ९.५० हेक्टर क्षेत्रावर ट्रक टर्मिनन्सचे व ४.३३ हेक्टर क्षेत्रावर कचरा डेपोचे आरक्षण आहे. ५५ हेक्टर पूरबाधित क्षेत्र आहे.