कोल्हापूर : जिल्हा प्रशासनातर्फे गुरुवारी संविधान गौरवदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या मार्गदशर्नाखाली भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य घडविण्याचा व सर्व नागरिकास, आर्थिक व राजनैतिक, न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य व समानता प्राप्त करून देण्यासाठी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वतंत्र राज्यघटना अंगीकृत आणि अधिनियमित केली. या दिनाचे औचित्य साधून जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छत्रपती शिवाजी सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी संविधानाचे वाचन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शंकर बर्गे, उपजिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, संगीता चौगुले, किरण कुलकर्र्णी, जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे, तहसीलदार रामहरी भोसले, डी. आर. सावंत यांच्यासह महसूल विभागातील अधिकारी, कमर्चारी उपस्थित होते. संविधनाच्या वाचनानंतर २६/११च्या मुंबई बॉम्बस्फोटातील हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. बिंदू चौकात संविधानाचे वाचनबिंदू चौकात सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त विजयकुमार गायकवाड यांनी संविधानाचे वाचन केले. यावेळी डॉ. बाजीराव पाटील, गनी आजगेकर, बाळासो भोसले, पुण्याच्या बार्टीचे पथक, दगडू भास्कर, ब्लॅक पँथरचे सुभाष देसाई यांच्यासह मुख्याध्यापकांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी बिंदू चौक येथे संविधान उद्देशिकेचे वाटप व तिचे सामूहिक वाचन करण्यात आले. संविधान वाचनानंतर राष्ट्रगीत झाले. सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहातील विद्यार्थी, विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थिर्नी सहभागी झाले होते.
जिल्ह्यात संविधान गौरवदिन साजरा
By admin | Updated: November 27, 2015 01:03 IST