शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील गडकिल्ल्यांचे संवर्धन फोर्ट फेडरेशनच्या माध्यमातून करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 20:18 IST

Sambhaji Raje Chhatrapati Fort kolhapur- राज्यातील ३५० हून अधिक गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी फोर्ट फेडरेशनची स्थापना करीत असल्याची घोषणा खासदार संभाजीराजे यांनी गुरुवारी केली. मेन राजाराम हायस्कूल येथे त्यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या दुसऱ्या दुर्ग परिषदेत ते बोलत होते.

ठळक मुद्देराज्यातील गडकिल्ल्यांचे संवर्धन फोर्ट फेडरेशनच्या माध्यमातून करणारदुर्ग संवर्धन करणाऱ्या राज्यातील २२७ हून अधिक संघटना एकत्र करणार

कोल्हापूर : राज्यातील ३५० हून अधिक गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी फोर्ट फेडरेशनची स्थापना करीत असल्याची घोषणा खासदार संभाजीराजे यांनी गुरुवारी केली. मेन राजाराम हायस्कूल येथे त्यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या दुसऱ्या दुर्ग परिषदेत ते बोलत होते.

खासदार संभाजीराजे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक म्हणून राज्यातील ३५० हून अधिक गडकिल्ल्यांचे संवर्धन करायचे आहे. त्याकरिता एक चळवळ उभी करणे गरजेचे आहे. राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या पुरातत्त्व खात्यातील संबंधितांशी बोलणे झाले आहे. हे काम मोठे आहे. त्याकरिता दुर्ग संवर्धन करणाऱ्या राज्यातील २२७ हून अधिक संघटनांना एकत्रित करण्यासाठी दुर्ग फेडरेशनची स्थापना केली आहे.

केंद्र सरकारच्या या विभागाशी सामंजस्य करार करून हे काम केले जाणार आहे. यात राज्य शासनाच्या सांस्कृतिक, पर्यटन, वन आदी विभागांशी समन्वय साधून ही फेडरेशन काम करेल. त्याचे सदस्यत्व राज्यातील गडकिल्ले संवर्धन करणाऱ्या २२७ संस्थांना देत आहोत. हे काम करीत असताना एकाच छताखाली या संस्था येणे गरजेचे होते.

यानिमित्त लवकर रायगड प्राधिकरणाच्या सदस्यांचीही बैठक घेतली जाईल. वाढदिवसानिमित्त राज्यातील २२७ संस्थांचे प्रतिनिधी एकत्रित आले, ही बाब निश्चितच भूषणावह आहे. आजही छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले संरक्षण कसे होईल, याकरिता ही मंडळी एकत्रित येऊन विचारविनिमय करीत आहेत.तत्पूर्वी इतिहासकालीन शस्त्र संग्राहक गिरीश जाधव, गडकिल्ले अभ्यासक सर्जेराव भामरे, वरुण भामरे, राम खुर्दळ, राम यादव, सचिन पाटील यांनी परिषदेत मार्गदर्शन केले. ठराव वाचन राम यादव व सुखदेव गिरी यांनी केले. धनंजय जाधव यांनी आभार मानले. 

टॅग्स :FortगडSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीkolhapurकोल्हापूर