शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

काँग्रेसचा फैसला सोमवारीच शक्य

By admin | Updated: December 3, 2015 01:14 IST

विधानपरिषद निवडणूक : भाजपची भूमिका नंतर ठरणार

कोल्हापूर : कोल्हापूर विधानपरिषद मतदार संघातील काँग्रेसच्या उमेदवाराचा फैसला सोमवारी सकाळीच जाहीर होण्याची शक्यता पक्षातील सूत्रांनी व्यक्त केली. काँग्रेसचा उमेदवार कोण, यावर आमच्या पक्षाची रणनीती अवलंबून असेल. आमदार महादेराव महाडिक यांनाच जर काँग्रेसची उमेदवारी मिळाली तर आमचा काही रोलच राहत नाही, असे भाजपचे नेते व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, उमेदवारीसाठी लॉबिंग करण्यासाठी दिल्लीस गेलेले आमदार महादेवराव महाडिक बहुधा आज, गुरुवारी कोल्हापुरात येत आहेत. माजी मंत्री प्रकाश आवाडे अजूनही दिल्लीतच तळ ठोकून बसले आहेत. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माजी आमदार पी. एन. पाटील व माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील हे मुंबईतच आहेत. हे चौघेही आपल्यालाच उमेदवारी मिळणार यावर ठाम असल्याने ती नक्की कुणाला मिळणार याबद्दल लोकांतही प्रचंड उत्कंठा लागून राहिली आहे. काँग्रेसची उमेदवारी मिळणे म्हणजे निवडणुकीतील पन्नास टक्के यश मिळण्यासारखेच असल्याने त्या उमेदवारीसाठी प्रथमच एवढी चुरस झाली आहे.कोल्हापूरच्या राजकारणात काँग्रेसमध्ये विधानसभेसाठीही अलीकडील काही वर्षांत एवढी चुरस कधी झालेली नाही; परंतु या उमेदवारीस महत्त्व असल्यानेच ती मिळविण्यासाठी टोकाची इर्ष्या पेटली आहे. पक्षाच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी या रविवारी रात्री उशिरा अमेरिकेहून परतणार आहेत. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे आज, बुधवारी नागपूरमध्ये होते. ते रात्री दिल्लीस जाणार आहेत. शनिवारी उमेदवारी जाहीर झाल्यास दुसऱ्या दिवशी सुटी आहे. त्यामुळे त्याऐवजी रविवारी रात्री अथवा सोमवारी सकाळीच काँग्रेसच्या उमेदवारांची घोषणा दिल्लीहून होण्याची शक्यता ठळक झाली आहे. आमदार महाडिक यांना तुमची उमेदवारी घट्ट झाली का, अशी विचारणा केली असता ते हसले व म्हणाले,‘घट्ट-पातळ अजून काही मला समजलेले नाही. राज्य व दिल्लीतील पक्षांच्या नेत्यांना भेटायचे होते ते भेटून आलो. आता पक्ष काय निर्णय घेतो त्यावर पुढील दिशा ठरवू.’ राज्यात सत्तेत असलेल्या भाजप-शिवसेनेची या मतदारसंघात मर्यादित ताकद आहे; परंतु भाजपने पालकमंत्री पाटील यांच्यावर या निवडणुकीची जबाबदारी टाकली आहे म्हणून त्यांना विचारणा केली असता पालकमंत्री म्हणाले,‘काँग्रेसची उमेदवारी कुणाला मिळते याची आम्ही वाट पाहत आहोत. ती जर महाडिक यांना मिळाली तर मग आमचा काही रोलच राहत नाही. ती अन्य कुणाला मिळाली तर काय करायचे याचा निर्णय घेऊ.’