शहरं
Join us  
Trending Stories
1
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
2
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
3
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
4
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
5
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
6
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
7
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार
8
संयम अन् सकारात्मकतेमुळे इथवर आलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उलगडले गुपित
9
Navratri 2025: तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रीला १४ सप्टेंबरपासून सुरुवात
10
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे चकमक; दोन अतिरेकी ठार
11
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
12
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
13
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
14
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
15
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
16
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
17
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
18
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
19
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
20
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका

मतदारसंघासाठी काँग्रेसकडून व्यूहरचना

By admin | Updated: January 16, 2017 00:42 IST

दहा वर्षांपासून महाआघाडीची सत्ता : भाजप स्वबळावर लढणार; अन्य घटक पक्षांचीही चाचपणी सुरू

अतुल आंबी ल्ल इचलकरंजीदहा वर्षांपूर्वी कॉँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या कबनूर (ता. हातकणंगले) येथील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या दोन अशा तीनही जागांवर सध्या भाजपप्रणित महाआघाडीची सत्ता आहे. केंद्र व राज्यातील सत्तेमुळे यंदा भाजपने ‘कमळ’ चिन्हावर निवडणूक लढविण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे काही घटक पक्षांबरोबर हातमिळवणी करीत भाजपच्या विळख्यातून तीनही मतदारसंघ सोडविण्यासाठी व्यूहरचना आखली जात आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना, तसेच रत्नाप्पाण्णा कुंभार - पी. एम. पाटील गटही स्वबळावर लढण्यासाठी उत्सुक आहे.कबनूर जिल्हा परिषद मतदारसंघात कबनूरसह तिळवणी, साजणी गावांचा समावेश आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती पूर्वसाठी नागरिकांचा मागास महिला (ओबीसी), तर पंचायत समिती पश्चिम-अनुसूचित जाती महिला (एस. सी.) असे आरक्षण पडले आहे. गत दोन निवडणुकांमध्ये कॉँग्रेसच्या विरोधात आमदार सुरेश हाळवणकर यांनी अन्य घटक पक्षांना सोबत घेऊन महाआघाडी केली. दोन्हीही वेळेला त्यांना यश मिळाले. हेवेदाव्यांमुळे कॉँग्रेसला पराभव पत्करावा लागला. त्यामुळे कॉँग्रेसमध्ये खळबळ उडाली. याचा विचार करीत माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी यावेळी या मतदारसंघात लक्ष घातले आहे. महाआघाडीतील अन्य घटक पक्ष, भाजपमधील नाराज व राष्ट्रवादी अशी एकत्र मोट बांधण्याच्या हालचालीही गतिमान झाल्या आहेत. तर राष्ट्रवादी नामशेष होत चालल्याने मदन कारंडे यांनीही गटाला ताकद देण्यासाठी हालचाली गतिमान केल्या आहेत. कारंडे गटाकडून पंचायत समितीच्या दोन्ही जागांसाठी चाचपणी सुरू असून, आवाडे यांच्याशी युती झाल्यास जागावाटपानुसार एकत्रित निवडणूक लढविण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.माजी मंत्री आवाडे यांचा दोनवेळा विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर मतदारसंघातील मोठी संख्या असलेल्या कबनूर गावाकडेही त्यांचे दुर्लक्ष झाल्याचे चित्र दिसते. याच संधीचा फायदा घेत सुरेश हाळवणकर यांनी कबनूरमध्ये राजकीय मोर्चेबांधणी सुरू केली. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये त्यांना यश मिळाले. मात्र, ग्रामपंचायत निवडणुकीत अपयश आले. ग्रामपंचायतीच्या निवडणुका व्यक्तिकेंद्रित असल्याने याला पूर्णपणे अपयशही म्हणता येत नाही. त्यानंतर इचलकरंजीतील नगरपालिका निवडणुकीत थेट नगराध्यक्षपदावर भाजपने बाजी मारली. केंद्रात, राज्यात आणि लगतच्या शहरात भाजपची एकहाती सत्ता असल्याने भारतीय जनता पक्षाकडून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका कमळ चिन्हावर लढविण्यावर भर दिला जात आहे. मात्र, ग्रामीण भागात गटा-तटाचे राजकारण असल्याने गत निवडणुकीत कपबशी चिन्हावर महाआघाडी म्हणून लढलेल्या गटातील काहीजण ‘कमळ’ चिन्हावर निवडणूक लढण्यास तयार नाहीत. त्यामुळे महाआघाडीतून काहीजण बाहेर पडण्याची शक्यता आहे. यामुळे निवडणूक मेरिट असलेले काही सदस्य, गट सोबत घेऊन भाजप व हाळवणकर यांना रोखण्यासाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकीत भाजप विरुद्ध कॉँग्रेससह अन्य पक्ष अशी दुरंगी लढत होते की, रत्नाप्पाण्णा कुंभार-पी. एन. पाटील गट, स्वाभिमानी शेतकरी संघटना अशी बहुरंगी लढत होते, याकडे लक्ष लागून राहिले आहे. विद्यमान सदस्य व पराभूत सदस्यगत निवडणुकीत जिल्हा परिषद मतदारसंघात विजया पाटील (भाजप) विजयी झाल्या. त्यांच्याविरोधात मंगल काडाप्पा होत्या. पंचायत समिती मतदारसंघात पूर्वमध्ये जयकुमार काडाप्पा (भाजप) विजयी झाले. त्यांच्याविरोधात युवराज पाटील होते. तर पश्चिममध्ये रेश्मा सनदी (भाजप) विजयी झाल्या. त्यांच्याविरोधात शबनम फरास उभ्या होत्या.मतदारसंघातील मतदार संख्या कबनूर जिल्हा परिषद मतदारसंघाची लोकसंख्या २६,५१८. यामध्ये दोन पंचायत समिती मतदारसंघ आहेत. त्यातील कबनूर पूर्व वॉर्ड क्रमांक ३,४,५,६ मध्ये पुरुष ७,६९२, महिला ६,८६० व इतर ३ असे एकूण १४,५५५ मतदार आहेत; तर पश्चिममध्ये कबनूर वॉर्ड क्रमांक १ व २ मध्ये पुरुष ३,०७४, महिला २,८०९, असे एकूण ५८८३ मतदार आहेत. तिळवणी येथे पुरुष १२६७, महिला ११८९, असे एकूण २४५६. साजणी येथे पुरुष १८७४, महिला १७५०, एकूण ३६२४ असे मतदारसंघात एकूण पुरुष ६,२१५, महिला ५,७४८, असे एकूण ११,९६३ मतदार आहेत.जिल्हा परिषद इच्छुक उमेदवार भारतीय जनता पक्षाकडून प्रतिभा कोळी, जयश्री जाधव, रेश्मा सनदी, मनीषा लोखंडे, रजनी गुरव व विजया पाटील; तर कॉँग्रेसकडून कांता बडवे, सुनीता खवरे, अनंती परीट, खलिदा फकीर, शहिदा मुजावर यांची नावे चर्चेत आहेत.पंचायत समिती इच्छुक उमेदवारपूर्व मतदारसंघातून संध्या पवार, रेश्मा सनदी, शबाना मुल्ला, सुरेखा स्वामी, सना सनदी, जयश्री कांबळे, कविता कुंभार, शहिदा मुजावर, तर पश्चिमसाठी परवीन पठाण, राधिका शिंदे, शोभा पवार, जयश्री राज, महानंदा कांबळे, मंगल मिणचेकर, आदी नावांची चर्चा आहे.