शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

काँगे्रस आघाडीसोबत गद्दारी करणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 00:56 IST

आजरा : काँगे्रस, राष्ट्रवादी आघाडी लोकसभेला जो उमेदवार देईल त्याच्या पाठीशी आपण ठामपणे राहणार आहे. कोणत्याही परिस्थितीत काँगे्रस आघाडीसोबत ...

आजरा : काँगे्रस, राष्ट्रवादी आघाडी लोकसभेला जो उमेदवार देईल त्याच्या पाठीशी आपण ठामपणे राहणार आहे. कोणत्याही परिस्थितीत काँगे्रस आघाडीसोबत गद्दारी करणार नसल्याचे प्रतिपादन काँगे्रसचे माजी आमदारपी. एन. पाटील यांनी केले.येथील अण्णा-भाऊ सांस्कृतिक सभागृहात ‘गोकुळ’चे अध्यक्ष रवींद्र आपटे यांची अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल आयोजित सर्वपक्षीय सत्कारप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार धनंजय महाडिक होते.पाटील म्हणाले, साखर कारखानदारी अडचणीत असताना ‘गोकुळ’मुळे शेतकºयांचा संसार चालत आहे. अरुण डोंगळे यांना तीन वर्षांसाठी अध्यक्षपदाची संधी दिली. मात्र, सर्वांना बरोबर घेऊन जाणारे आपटे यांचे नेतृत्व आणि त्यांनाही तीन वर्षांची संधी मिळावी म्हणून अध्यक्षपदी निवड केली. लहान ताुलक्याला मोठे पद दिल्याने आपटे यांनी संधीचे सोने करावे.खासदार महाडिक म्हणाले, आपटे यांचे सर्वसमावेशक नेतृत्व आहे. गोकुळमुळे कोल्हापूर जिल्ह्यात शेतकºयांना आर्थिक आधार मिळाला आहे, त्यामुळे आत्महत्या होत नाहीत. त्यामुळे दूध उत्पादने वाढविण्याची आपटे यांची मोठी जबाबदारी असल्याचे सांगून लोकसभेला मदत करण्याचे आवाहन महाडिक यांनी केले.यावेळी पी. एन. पाटील व खासदार महाडिक यांच्या हस्ते आपटे यांचा सत्कार करण्यात झाला. आपटे, माजी राज्यमंत्री भरमू पाटील, अशोक चराटी, अरुण डोंगळे, उमेश आपटे, सागर देशपांडे नामदेव नार्वेकर, मसणू सुतार, महादेव पाटील यांची भाषणे झाली.यावेळी सभापती रचना होलम, उद्योजक रमेश रेडेकर, श्रीपतराव देसाई, राजेश पाटील, डॉ. अनिल देशपांडे, आलम नाईकवाडे, रामराजे कुपेकर, दशरथ अमृते, मनीषा गुरव, अंकुश पाटील, जयश्री पाटील, आदी उपस्थित होते. समीर देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. संजय सावंत आभार मानले.