शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महाडिक यांना वगळून काँग्रेस लढणार

By admin | Updated: September 23, 2015 00:16 IST

पतंगराव कदम यांची घोषणा : महापालिका निवडणुकीसाठी साठ उमेदवारांची यादी तयार; बैठकीत शिक्कामोर्तब

कोल्हापूर : प्रत्येक निवडणुकीवेळी पक्षात राहून दगाबाजी होत असल्याचा अनुभव लक्षात घेता यावेळी आमदार महादेवराव महाडिक यांना वगळून महानगरपालिकेची निवडणूक लढविण्यास काँग्रेस पक्ष सक्षम आहे, तसा निर्णय झाला आहे. पक्षच एवढा मोठा आहे की त्यामुळे कोणी पक्षासोबत असले आणि नसले तर काँग्रेसला काही फरक पडत नाही, अशा शब्दांत माजी मंत्री पतंगराव कदम यांनी मंगळवारी महाडिक यांना फटकारले. महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवारांची यादी निश्चित करण्याकरीता मंगळवारी दुपारी शासकीय विश्रामगृहावर बैठक झाली. या बैठकीत माजी मंत्री पतंगराव कदम, सतेज पाटील, रमेश बागवे, पक्ष निरीक्षक सत्यजित देशमुख, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पी. एन. पाटील, शहर काँग्रेस अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा संध्या घोटणे उपस्थित होत्या. बैठकीनंतर पतंगराव कदम यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कदम म्हणाले, ‘ आमदार महाडिक यांचा पूर्वीचा अनुभव लक्षात घेऊन आम्ही काँग्रेस पक्षातर्फे त्यांना वगळून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्याविषयी बैठकीत घासून-पुसून चर्चा झाली. अप्रत्यक्ष विरोध करणार असतील तर त्यांना सोबत घेण्यात अर्थ नाही; यावर आमचे एकमत झाले. त्यांचा आणि काँग्रेस पक्षाचा संबंध राहिलेला नाही. त्यांना सोबत घेतले नाही म्हणून काँग्रेसच्या उमेदवारांवर काही परिणाम होणार नाही. महाडिक सध्या काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत. त्यामुळे त्यांनी जर विरोधाची भूमिका घेतलीच तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल.’ (प्रतिनिधी) ‘महाडिक’ विषय संपलामहाडिक पक्षासोबत असल्याचे सांगतात आणि नेमकी उलटी भूमिका घेतात. त्याचा त्रास उमेदवारांना व पक्षालाही झाला. त्यामुळे त्यांना वगळूनच महापालिकेची निवडणूक लढविणार आहोत. आमच्यादृष्टीने महाडिकांचा विषय आता संपलेला आहे. महाडिक यांच्यावर कारवाई करण्यास पक्ष नेतृत्व हतबल नाही. योग्य वेळी कारवाई करेल.उमेदवारांची यादी तयार काँग्रेस पक्षाने सर्व ८१ प्रभागांतून निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे. मंगळवारच्या पहिल्या बैठकीत ६० प्रभागांतील उमेदवारांची नावे निश्चित केली. येत्या दोन-चार दिवसांत ती जाहीर करु. पक्षात आता गट-तट राहिले नसून सर्व नेते एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जातील. त्यामुळे पक्षाला सत्तेपर्यंत पोहोचेल, असे कदम यांनी सांगितले.एकदा होऊन जाऊ देविधान परिषदेचे उमेदवार म्हणून महादेवराव महाडिक यांचे नाव असेल का, अशी विचारणा करता कदम म्हणाले की, विधान परिषदेची निवडणूक लागल्यावर त्या गोष्टीवर चर्चा होईल. महाडिक असतील की नसतील यापेक्षा काँग्रेसचा उमेदवार असेल एवढे नक्की आहे.प्रचारात विकासाचा मुद्दा मनपाच्या निवडणुकीत आम्ही विकासाचा मुद्दा घेऊन जनतेसमोर जाणार आहोत. शहरात केलेली विकासाची कामे आणि पुढील काळात काय करणार आहोत याचा अजेंडा आम्ही मतदारांसमोर ठेवणार आहोत, असे सतेज पाटील यांनी सांगितले. प्रचाराचा एकत्रित शुभारंभ आणि सांगता समारंभ मोठ्या स्वरूपात असेल तर प्रत्येक प्रभागात कॉर्नर सभा घेतल्या जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.