शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
2
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
3
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
4
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
5
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
6
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
7
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
8
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
9
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
10
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
13
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
14
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
15
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
16
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
17
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
18
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
19
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
20
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)

हातकणंगलेत काँग्रेस, जनसुराज्य, भाजप सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 23:50 IST

आयुब मुल्ला ।लोकमत न्यूज नेटवर्कखोची : हातकणंगले विधानसभा मतदारसंघात इच्छुकांनी आपली राजकीय यंत्रणा राबविण्यास सुरुवात केली आहे. या संदर्भातील पहिली सुरुवात जाहीरपणे काँग्रेस व जनसुराज्यने केली आहे, तर भाजपनेसुद्धा हालचाल सुरू केली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून या तिन्ही पक्षांच्या इच्छुकांनी आपण निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे कार्यक्रमातून स्पष्ट केले आहे. शिवसेनेचे आमदार ...

आयुब मुल्ला ।लोकमत न्यूज नेटवर्कखोची : हातकणंगले विधानसभा मतदारसंघात इच्छुकांनी आपली राजकीय यंत्रणा राबविण्यास सुरुवात केली आहे. या संदर्भातील पहिली सुरुवात जाहीरपणे काँग्रेस व जनसुराज्यने केली आहे, तर भाजपनेसुद्धा हालचाल सुरू केली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून या तिन्ही पक्षांच्या इच्छुकांनी आपण निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे कार्यक्रमातून स्पष्ट केले आहे. शिवसेनेचे आमदार हट्ॅट्रिक करणार, अशी आशा स्वत: व्यक्त करीत आहेत. एकूणच उन्हाळ्यात राजकीय हवा मात्र तापू लागली आहे.हातकणंगले विधानसभा मतदारसंघात उघडपणे निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेसचे माजी मंत्री जयवंतराव आवळे यांनी गत आठवड्यात कार्यकर्त्यांच्या बैठकीत भूमिका मांडली. त्यानुसार गुढीपाडव्यापासून जिल्हा बँकेचे संचालक राजू आवळे मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. त्यामुळे विधानसभेचे उमेदवार राजू आवळे असतील हे प्राथमिक टप्प्यात स्पष्ट झाले असून, जयवंतराव आवळे आता लढणार नाहीत, हे त्यावरून सिद्ध झाले आहे.जनसुराज्य पक्षाचे माजी आमदार राजीव आवळे यांनी गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात स्वत:चा वाढदिवस प्रथमच सार्वजनिक स्वरूपात साजरा केला. कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यावेळी माजी मंत्री विनय कोरे यांनी, राजीव आवळे यांना आगामी राजकीय वाटचालीसाठी सर्वांनी ताकद द्या, असे आवाहन केले. तेव्हापासून आवळे यांनी आपली यंत्रणा गतिमान केली आहे.भाजपही जिल्हा परिषद व हुपरी नगरपालिका निवडणुकीत मिळालेल्या यशाने आमदारकीच्या यशाला गवसणी घालता येते काय, या प्रयत्नात आहे. या पक्षाकडून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचे स्वीय सहायक अभयकुमार वंटे यांचे नाव चर्चेत आहे. दोन आठवड्यांपूर्वी पक्षातील कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यावेळी हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून अभयकुमार वंटे यांना उमेदवारी द्यावी, अशी कार्यकर्त्यांनी मागणी केल्याचे समजते. सध्या वंटे यांनीही मतदारसंघात संपर्क वाढविला आहे. तालुक्यात अनेक राजकीय गट आहेत; पण ते कोणत्याही पक्षात सक्रिय नाहीत, अशा गटांचे वंटे यांना समर्थन मिळू शकते, असे बोलले जात आहे. त्यांनी टीमवर्कद्वारे संपर्क वाढविला आहे.शिवसेनेचे विद्यमान आमदार डॉ. सुजित मिणचेकर हे आगामी विधानसभा निवडणुकीकडे विजयी हॅट्ट्रिक करण्याच्या दृष्टीने पाहत आहेत. त्यांना यापूर्वीच्या निवडणुकींमध्ये इतर पक्षातील नाराज, तसेच अन्य राजकीय गटांनीही मदत केली; पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. त्यामध्ये अनेक बदल होताना दिसत आहेत. वेगवेगळे पर्यायही समोर आले आहेत, अशावेळी सुरुवातीची गट बांधणी टिकवून ठेवणे महत्त्वाचे ठरणार आहे.बंडखोर सेनेचे अध्यक्ष शिवाजीराव आवळे यांनीही पेठवडगावमध्ये मेळावा घेऊन निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच डॉ. मिलिंद हिरवे, डॉ. अविनाश सावर्डेकर यांनीही संपर्क वाढविला आहे. त्यांचा अद्याप पक्ष कोणता हे निश्चित नाही; पण तयारी जोरदार सुरू केली आहे.