शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

‘गडहिंग्लज’मध्ये काँगे्रस स्वबळावर

By admin | Updated: November 11, 2016 00:35 IST

सामना चौरंगी : राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडीची शक्यता संपुष्टात

राम मगदूम -- गडहिंग्लजगडहिंग्लज नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी व काँग्रेस यांची युती होण्याची चर्चा आठवडाभर रंगली. मात्र, माघारीच्या आदल्या दिवसापर्यंत दोन्ही पक्षात जागावाटपासंदर्भात कोणतीही ठोस चर्चा झालेली नाही. मागणीनुसार काँगे्रसला समाधानकारक जागा मिळणे दुरापास्त झाले आहे. यामुळेच दोघांतील आघाडीची शक्यता धूसर बनली आहे. सन्मानकारक जागा न मिळाल्यास काही अपक्षांना पुरस्कृत करून स्वबळावर लढण्याची तयारी काँगे्रसनेही चालविली आहे. त्यामुळेच येथील सामना चौरंगी होण्याची शक्यता आहे.आमदार हसन मुश्रीफ व आमदार सतेज पाटील हे दोघेही गडहिंग्लज साखर कारखाना निवडणुकीत एकत्र आले. त्यामुळे काँगे्रसला उपाध्यक्षपदासह कारखान्याच्या सत्तेत भागीदारी मिळाली. त्याच धर्तीवर राष्ट्रवादीबरोबर युती करण्याचा निर्णय काँगे्रसजणांनी घेतला. गडहिंग्लज कारखाना गळीत हंगाम प्रारंभप्रसंगी आमदार पाटील यांनी राष्ट्रवादीबरोबरच्या आघाडीस जाहीरपणे दुजोराही दिला. त्याच दिवशी दोनही पक्षांच्या प्रमुख कार्यकर्त्यांत यासंदर्भात चर्चाही झाली. उपनगराध्यक्षपदासह ७ जागा मिळाव्यात, अशी अपेक्षा काँगे्रसने केली. त्यानुसार काँगे्रसच्या संभाव्य उमेदवारांची नावेदेखील राष्ट्रवादीकडे देण्यात आली. मात्र, त्यानंतर युतीबाबत कोणतीच चर्चा झालेली नाही.दरम्यान, राष्ट्रवादीने शक्तिप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल करून सर्व जागांवर आपल्या उमेदवारांचा प्रचारही सुरू केला आहे. प्रचारात ‘पुढे गेलेल्या’ कट्टर आणि निष्ठावंत कार्यकर्ते उमेदवारांना थांबविणे राष्ट्रवादीला अवघड झाले असून, आघाडीची शक्यता कमी वाटते. यामुळेच अस्तित्वासाठी काँगे्रसदेखील अपक्षांच्या साथीने मैदानात उतरण्याची शक्यता आहे.आघाडीची शक्यता का नाही? गडहिंग्लज पालिका निवडणुकीबाबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत आमदार सतेज पाटील यांनी पक्षाचे चिन्ह तळागाळात पोहोचविण्यासाठी काँगे्रसही स्वबळावर रिंगणात उतरण्याचे सूतोवाच केले होते. नगराध्यक्षपदाच्या जागेसह सर्व जागा लढवून पक्ष बांधणीसाठी स्वबळाचा प्रयोग होऊ शकतो. प्रभाग २ ब मध्ये राष्ट्रवादीतर्फे बाळासाहेब घुगरे यांची, तर काँगे्रसतर्फे महेश सलवादे, ४ अ मध्ये राष्ट्रवादीतर्फे रूपाली परीट, तर काँगे्रसतर्फे करिश्मा मुल्ला, ४ ब मध्ये काँगे्रसतर्फे सुधीर पाटील, तर राष्ट्रवादीतर्फे सुनील गुरव, ६ अ मध्ये काँगे्रसतर्फे बीना कुराडे, तर राष्ट्रवादीतर्फे माधुरी शिंदे यांची उमेदवारी आहे. या प्रभागांतील उमेदवारीसाठीच काँगे्रसचा आग्रह असून, ते राष्ट्रवादीला मान्य होण्यासारखे नाही. यामुळेच ही आघाडी अशक्य वाटते.