शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

विद्यापीठावर अभिनंदनाचा वर्षाव

By admin | Updated: December 12, 2014 00:34 IST

‘ए’ मानांकन : यशाची नवी शिखरे गाठूया : एन. जे. पवार

कोल्हापूर : ‘अ’ मानांकनामुळे आता आपला आत्मविश्वास उंचावला आहे. त्याचा उपयोग यशाची आणखी उंच आणि नवी शिखरे काबीज करण्यासाठी करू या, असे आवाहन कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांनी आज, गुरुवारी येथे केले.विद्यापीठातील सर्व अधिविभागप्रमुख आणि प्राध्यापक, प्रशासकीय सेवकांची संयुक्त बैठक ते बोलत होते. राजर्षी शाहू सभागृहात बैठक झाली. कुलगुरू डॉ. पवार म्हणाले, ‘नॅक’च्या ‘अ’ मानांकनामुळे आता विद्यापीठाशी संबंधित सर्वच घटकांवरील जबाबदारी वाढली आहे. आपणा सर्वांच्या सांघिक भावनेमुळे मिळालेले हे यश असून, या पुढील काळातही येणाऱ्या प्रत्येक आव्हानाचे सोन्याच्या संधीत रूपांतर करण्यासाठी सांघिकपणानेच प्रयत्न करूया. त्या दृष्टीने योग्य नियोजन करण्याची अपेक्षा आहे.दरम्यान, राष्ट्रीय मूल्यांकन परिषदेचे (नॅक) ‘अ’ मूल्यांकन जाहीर झाल्याने आज दिवसभरात शिवाजी विद्यापीठावर शैक्षणिक, सामाजिक, आदी संस्था-संघटनांनी, विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. यात कुलगुरू डॉ. पवार, प्र-कुलगुरू डॉ. अशोक भोईटे, आदींना प्रत्यक्ष भेटून अभिनंदन करण्यासाठी विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा दिवसभर ओघ सुरू होता. शिवाय दूरध्वनी, मोबाईल, एसएमएस, सोशल मीडिया, ई-मेल आदींंच्या माध्यमातून अभिनंदनांचा वर्षाव झाला. ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन. डी. पाटील, ‘नॅक’चे समन्वयक डॉ. गणेश हेगडे, आरोग्य विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. शेखर राजदेरकर, डी. वाय. पाटील शिक्षण समूहाचे डॉ. संजय डी. पाटील, मुंबई विद्यापीठाचे बीसीयूडी संचालक डॉ. राजपाल हांडे, शाहू शिक्षण संस्थेचे चंद्रकांत बोंद्रे, अशोकराव माने शिक्षण समूहाचे कार्यकारी संचालक डॉ. दीपक मुद्गल, प्राचार्य डॉ. एस. एस. पाटील, डॉ. नलवडे, डॉ. क्रांतिकुमार पाटील, जे. बी. पिष्टे, पुणे विद्यापीठाच्या भूगर्भशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. नितीन करमरकर, नांदेड विद्यापीठाचे बीसीयूडी संचालक डॉ. डी. बी. पानस्कर, डॉ. बी. पी. साबळे, डॉ. डी. व्ही. पवार, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन रावसाहेब शिंदे, अनिल पाटील, गणेश ठाकूर, आदींनी शुभेच्छा दिल्या. (प्रतिनिधी)