शहरं
Join us  
Trending Stories
1
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
2
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
3
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
4
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
5
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
6
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
7
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
8
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
9
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
10
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
11
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी
12
संतापजनक! २ मुलांची आई पडली १७ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात, दोघंही झाले फरार; आता महिलेवर POCSO कारवाई!
13
जरांगेंचा होकार, पण जर जीआरमध्ये काही दगा फटका झाला तर...; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा
14
"मला मावशीच्या मिठीतच शांतता मिळते"; पतीचं बोलणं मनाला लागलं, नवविवाहितेनं टोकाचं पाऊल उचललं!
15
रात्री ९ वाजेपर्यंत मुंबई खाली करतो, मराठ्यांची पोरं नाचत जातील, पण...; मनोज जरांगेंचा विखेंना शब्द
16
श्रीसंतची दुखापत अन् RR फ्रँचायझीचा ८२ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा! विमा कंपनीची सर्वोच्च न्यायालयात धाव
17
Manoj Jarange: मनोज जरांगे आजच उपोषण सोडणार? हैदराबाद गॅझेटचा जीआर निघणार, सातारा गॅझेटीयरची जबाबदारी शिवेंद्रराजेंनी घेतली...
18
Pitru Paksha 2025: गणेशोत्सवानंतर लगेचच पितृपक्ष का? ९० टक्के लोकांना माहीतच नाही खरे कारण!
19
"कुठलाही विषय असू दे, मी नेहमी धावून जातो, पण...!" जरांगेंच्या आंदोलनावर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया; स्पष्टच बोलले
20
Viral Video : गर्लफ्रेंडचा फोन सतत लागत होता व्यस्त, संतापलेल्या बॉयफ्रेंडनं काय केलं बघाच!

भुलतज्ज्ञ डॉक्टर नियुक्तीवरून शिवसैनिकांचा ‘सीपीआर’मध्ये गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:21 IST

कोल्हापूर : भूलतज्ज्ञाअभावी रखडलेल्या शस्त्रक्रियेच्या प्रश्नावरून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी ‘सीपीआर’मध्ये निदर्शने करीत सुमारे अडीच तास गोंधळ घातला. फक्त आश्वासन ...

कोल्हापूर : भूलतज्ज्ञाअभावी रखडलेल्या शस्त्रक्रियेच्या प्रश्नावरून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी ‘सीपीआर’मध्ये निदर्शने करीत सुमारे अडीच तास गोंधळ घातला. फक्त आश्वासन देऊन दोन दिवसांपूर्वी वेळ मारून नेणारे रा. छ. शा. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे हे आंदोलकांच्या प्रश्नांमुळे निरुत्तर झाले. अखेर आरोग्य संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्याशी फोनवर झालेल्या चर्चेनंतर सोमवारपासून भूलतज्ज्ञ डॉक्टर देण्याचा निर्णय झाला.

दरम्यान, सीपीआर’मध्ये भूलतज्ज्ञ डॉक्टर मिळावा यासाठी वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर शिवसैनिकांनी शनिवारी दुपारी डोळ्यावर काळ्या पट्ट्या बांधून निदर्शने केली.

‘सीपीआर’मध्ये ‘भूलतज्ज्ञ डॉक्टरअभावी अनेक शस्त्रक्रिया रखडल्या’ याबाबत लोकमतने सविस्तर पाठपुरावा करीत वाचा फोडली होती. त्याचे पडसाद शनिवारी तीव्रपणे उमटले. भूलतज्ज्ञ डॉक्टर प्रश्नावरून शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय पवार, विजय देवणे व त्यांच्या साथीदारांनी ‘सीपीआर’मध्ये निषेध नोंदविला. आंदोलकांनी हदय शस्त्रक्रिया विभागात जाऊन पहाणी केली. तसेच त्यांनी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांंना फोन करून सीपीआरमधील भोंगळ कारभाराची चर्चा केली. अधिष्ठाता डॉ. मोरे यांच्या दालनात आंदोलक व डॉक्टरांची बैठक झाली. बैठकीत, अधिष्ठाता डॉ. मोरे हे विसंगत माहिती देऊ लागल्याने शिवसैनिक संतप्त झाले. त्यांनी, २४ तासांत भूलतज्ज्ञ भरणार नसाल तर सर्व कार्यालयांना कुलूपे लावू, असा इशाराच देऊन शिवसैनिक चर्चेतून उठले.

डॉ. मोरे यांनी आरोग्य संचालक डॉ. तात्याराव लहाने यांची आंदोलकांशी फोनवर चर्चा घडविली. हदय शस्त्रक्रिया विभागाच्या प्रमुख डॉ. आरती घोरपडे यांच्या कामकाजाबद्दलही नाराजी व्यक्त केली. घोरपडे यांची विभागातून उचलबांगडी करू असे आश्वासन डॉ. मोरे यांनी शिवसैनिकांना दिले. सोमवारपासून डॉ. हेमलता देसाई यांची भूलतज्ज्ञ डॉक्टर म्हणून नियुक्तीचे आश्वासन दिल्याने आंदोलक शांत झाले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर देवरे, डॉ. गिरीष कांबळे यांच्यासह जिल्हाध्यक्ष संजय पवार, विजय देवणे, राजेंद जाधव, दिलीप देसाई, रणजित आयरेकर, पप्पू नाईक, अभिषेक बुकशेट, दिलीप जाधव, प्रकाश पाटील आदी सहभागी झाले होते.

कुलूप लावतो...

दोन दिवसांपूर्वी नियुक्त झालेल्या भूलतज्ज्ञ डॉक्टरांनी बैठकीतच, पूर्ण कार्यक्षमतेने काम करू शकत नसल्याचे सांगितल्याने शिवसैनिक खवळले. फसवणुकीचे आश्वासन दिल्याबद्दल सर्व कार्यालयांना कुलूप लावू असा इशारा शिवसैनिकांनी अधिष्ठातांना दिला. सीपीआरमधील भोंगळ कारभार पाहून दिवंगत दिग्विजय खानविलकर यांच्या डोळ्यात पाणी येत असेल असेही पवार म्हणाले. अखेर चर्चेनंतर डॉ. देसाई व आणखी एकाची नियुक्ती करण्याचे आदेश डॉ. मोरे यांनी दिले.