शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
2
स्कुबा डायव्हिंग करताना ५२ वर्षीय प्रसिद्ध गायकाचा मृत्यू, चाहत्यांना मोठा धक्का
3
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
4
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
5
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
6
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
7
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
8
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
9
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
10
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
11
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
12
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
13
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
14
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
15
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
16
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
17
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
18
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
19
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
20
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती

पार्किंग बंदिस्तसाठी संमतीनेच गोलमाल : काही अधिकारी, नगरसेवकांची मिलीभगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2019 00:35 IST

उपनगरांत किंवा विस्तारित शहरात झालेल्या मोठ्या गृहप्रकल्पांत पुरेसे पार्किंग सोडलेले दिसून येते; परंतु ज्या इमारती गावठाणात आहेत, तेथे मात्र पार्किंगचा विषय गंभीर आहे. याला कारण म्हणजे मध्यवस्तीत झालेल्या उंच इमारतीत पुरेसे पार्किंग ठेवलेले नाही.

ठळक मुद्दे महापालिका प्रशासनाने घ्यावा शोध

भारत चव्हाण ।कोल्हापूर : शहरातील मोठमोठ्या इमारतींचे पार्किंग गायब झाल्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असल्याची तक्रार रास्त असली तरी हे पार्किंग गायब होण्यास कारणीभूत कोण आहेत, याचाही शोध महापालिका प्रशासनाने घेतला पाहिजे. मंगळवारी (दि. ३) विशेष सभेत झालेल्या मागणीनुसार अहवाल तयार होईल; परंतु तो कितपत वस्तुनिष्ठ असेल याबाबत साशंकता आहे; कारण अधिकारी व नगरसेवकांच्या संमतीशिवाय ही पार्किंग बंदिस्त झालेली नाहीत.

शहरातील वाढती रहदारी आणि त्यामुळे होणारी कोंडी हा गंभीर विषय असून, भविष्यकाळाचा विचार करता त्यावर उपाययोजना करणे आवश्यक आहे. महापालिकेच्या विशेष सभेत मंगळवारी यावर चर्चा झाली आणि बंदिस्त झालेली पार्किंग चव्हाट्यावर आली. महापौर लाटकर यांनी चार विभागीय कार्यालयांचे अधिकारी व नगररचना विभागाचे अधिकारी यांना २० डिसेंबरपर्यंत या संदर्भात अहवाल देण्याचे आदेश दिले. हा अहवाल कसा असेल, याचा अंदाज आताच करता येईल; कारण ज्यांनी या पार्किंगच्या जागा बंदिस्त होण्यास हातभार लावला, तेच अधिकारी त्याकडे बोट कसे दाखवतील हा प्रश्न आहे.

उपनगरांत किंवा विस्तारित शहरात झालेल्या मोठ्या गृहप्रकल्पांत पुरेसे पार्किंग सोडलेले दिसून येते; परंतु ज्या इमारती गावठाणात आहेत, तेथे मात्र पार्किंगचा विषय गंभीर आहे. याला कारण म्हणजे मध्यवस्तीत झालेल्या उंच इमारतीत पुरेसे पार्किंग ठेवलेले नाही. जेथे पार्किंगला जागा सोडली आहे, ती प्रमाणापेक्षा कमी आहे. शहराच्या मध्यवस्तीतील जागेचे भाव गगनाला भिडलेले आहेत. एखाद्या बांधकाम व्यावसायिकाने इमारत विकसित केली की तिची मालकी कायम असल्यासारखे ते वागतात.

पार्किंगला सोडलेल्या जागेवर तसेच इमारतीच्या छतावरदेखील त्या बांधकाम व्यावसायिकाचाच ताबा असतो. गरज पडेल तसे बांधकाम केले जाते; परंतु या वाढीव बांधकामामुळे तेथील वाहनांची संख्याही वाढत राहते.

पार्किंगच्या जागी कालांतराने रीतसर गोदामे बांधण्यासाठी परवानगी घेतली जाते. जर एखादी जागा पार्किंगसाठी म्हणूनच सोडली जात असेल तर कालांतराने तेथे गोदाम बांधण्यासाठी का परवानगी द्यावी, याचा विचार महापालिकेचे अधिकारी करीत नाहीत. तसा त्यांना प्रश्नही पडत नाही; कारण अशा प्रकारात सर्वांचेच हात ओले होत असतात. शहराच्या मध्यवस्तीत अशी अनेक गोदामे नंतर व्यावसायिक दुकानगाळ्यांत रूपांतरित झाली आहेत. त्यामुळेच पार्किंग बंदिस्त होऊन वाहने रस्त्यांवर आली आहेत.

कारवाई केली जात नाहीअनधिकृत बांधकामाला प्रोत्साहन देणारे नगरसेवक जसे अपात्र ठरू शकतात, तसे अधिकारीही जबाबदार धरले जाण्याचा कायदा अस्तित्वात आहे; परंतु कोणीही आयुक्त अशा अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करीत नाहीत; त्यामुळे अधिकारीही बोकाळले आहेत.

त्यांचे उत्पन्न होते सुरूपार्किंगच्या जागेवर बांधलेले दुकानगाळे विकता येत नाहीत. त्यामुळे पार्किंग बंदिस्त करून गोदामे बांधायची आणि त्याचे भाडे मात्र आजीवन घेत बसायचे, असे प्रकार सर्रास सुरू आहेत. विशेष म्हणजे अशा गोदामांना घरफाळाही आकारला जात नाही हे विशेष. त्याच्याकडे महापालिकेच्या कोणत्याच यंत्रणेचे लक्ष नाही.

मूळ आराखड्यात होतात बदलइमारतीचा आराखडा तयार करताना दुकानगाळ्यांची संख्या, येणाऱ्या वाहनांची संख्या यांचा विचार करून पार्किंगला जागा सोडावी लागते. आराखडा मंजूर झाल्यावर अंतर्गत बदल केले जातात. ज्या ठिकाणी २५ दुकानगाळे दाखविलेले असतात, तेथे त्याची संख्या तीस-पस्तीसच्या घरात पोहोचते. त्यामुळे त्या इमारतींवरील ताण आपोआप वाढतो.

 

  • इमारतीचा आराखडा करताना पार्किंग दाखवितात
  • कालांतराने पार्किंगच्या जागेत खासगी अतिक्रमण
  • अधिकाऱ्याकडून गोदामे बांधण्यास परवानगी
  • परवानगी देताना पार्किंगचा विचार नाहीच
  • बंदिस्त पार्किंग शोधणे अधिकाऱ्यांच्याच हातात
  • वस्तुनिष्ठ अहवालाबाबत साशंकताच
टॅग्स :kolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिकाParkingपार्किंग