शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
2
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
3
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
4
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
5
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
6
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
7
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
8
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
9
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
10
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
11
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
12
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
13
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
14
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
15
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
16
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
17
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
18
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
19
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
20
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस

वेतनवाढीच्या तफावतीने संघर्षाची चिन्हे

By admin | Updated: December 17, 2014 23:10 IST

दुप्पट वाढ कळीचा मुद्दा : कामगार, यंत्रमाग संघटनांच्या वेतनात ७२५ रुपयांचा फरक

राजाराम पाटील - इचलकरंजी -येथील यंत्रमाग कामगारांना मिळणाऱ्या वेतन वाढीसंदर्भात कामगार संघटना व यंत्रमाग संघटना यांच्यातील तफावतीमुळे पुन्हा संघर्ष होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, आठ तास काम आणि त्यावरील कामासाठी दुप्पट वेतन, अशी मागणी कामगार संघटना संयुक्त कृती समितीने केल्याने हा विषयसुद्धा कळीचा मुद्दा ठरू लागला आहे.यंत्रमाग कामगारांना वेतनवाढ मिळण्याबरोबरच किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी करावी. तसेच यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळ स्थापित करावे या मागणीसाठी यंत्रमाग उद्योगातील सर्व कामगार संघटनांनी एकत्रितपणे जानेवारी २०१३ मध्ये आंदोलन छेडले. यापूर्वी कधीही नाही इतके आंदोलन लांबल्याने तब्बल ४२ दिवसांचा संप झाला; पण विक्रमी मजुरीवाढ मिळाली आणि ५२ पिकाच्या कापडासाठी प्रतिमीटर ८७ पैसे मजुरीचा निर्णय झाला. दरम्यान, दरवर्षी महागाई निर्देशांकाशी निगडित मजुरीवाढीचीही घोषणा केली. जेणेकरून नेहमी होणाऱ्या आंदोलनातून उद्योगाची मुक्तता होईल आणि संपामुळे होणारे नुकसानही टळेल.उपरोक्त ठरल्याप्रमाणे डिसेंबर २०१३ अखेर किंवा जानेवारी २०१४ मध्ये सहायक कामगार आयुक्तांनी महागाई निर्देशांकाप्रमाणे वेतनवाढीची घोषणा केली नाही. कामगार संघटनांनी मागणी केली. या मागणीत वार्षिक महागाई निर्देशांकाप्रमाणे वेतनवाढ मागितली, तर यंत्रमागधारक संघटनांच्या म्हणण्यानुसार फक्त सहा महिन्यांची वेतनवाढ मिळेल. कारण फेब्रुवारी २०१३ मध्ये वेतनवाढ देताना (८७ पैसे प्रतिमीटर) तेव्हा डिसेंबर २०१२ अखेरची महागाई गृहीत धरली आहे. हा वाद तत्कालीन कामगारमंत्री हसन मुश्रीफ आणि कामगार आयुक्त आर. आर. हेंद्रे यांच्यासमोर गेला. कामगार आयुक्त हेंद्रे यांनी यंत्रमागधारक संघटनांचा युक्तिवाद मान्य केला आणि सहा महिन्यांचा महागाई निर्देशांकावर आधारित चार पैसे प्रतिमीटर वाढ दिली आणि या प्रकरणावर पडदा पडला तरी कामगार संघटनांची नाराजी राहिली.आता कामगार संघटनांनी वार्षिक वेतनवाढ जाहीर करावी. तसेच आठ तास काम आणि त्यावरील कामासाठी (ओव्हर टाईम) दुप्पट पगाराची मागणी केली आहे; पण कामगार संघटना व यंत्रमागधारक संघटनांच्या गणितामध्ये ७२५ रुपये वेतनाचा फरक येत आहे.शनिवारी यंत्रमागधारकांची बैठककामगार वेतनवाढ आणि आठ तासांच्या कामाबद्दल २० डिसेंबरला यंत्रमागधारक संघटनांची बैठक बोलविण्यात येईल आणि त्यानंतर २२ डिसेंबरला कामगार व यंत्रमागधारक यांच्या संघटनांची संयुक्त बैठक बोलविली जाईल, असे सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव यांनी सांगितल्याची कामगार नेते दत्ता माने यांनी माहिती दिली.वार्षिक महागाई निर्देशांक ५३४ आहे. त्याप्रमाणे यंत्रमाग कामगारांना प्रतिमीटर ८ पैसे वेतनवाढ मिळाली पाहिजे. जेणेकरून यंत्रमाग कामगारांना महिन्याला ५,८२४ रुपये वेतन मिळेल. आता जानेवारी २०१५ पासून ८ तास काम व त्यावरील कामासाठी दुप्पट पगार मिळाला पाहिजे, अन्यथा कामगाराला पुन्हा रस्त्यावरील लढाई करावी लागेल.- भरमा कांबळे, सचिव, लालबावटा जनरल कामगार युनियन.गतवर्षीच्या महागाई निर्देशांकाप्रमाणे यंत्रमाग कामगारांना प्रतिमीटर ७ पैसे वेतन मिळेल. त्यांचा महिन्याचा पगार ५०९६ रुपये होईल. त्याचबरोबर माजी कामगारमंत्री मुश्रीफ यांनी ८ तासांच्या कामाबद्दल काही भाष्य केल्याचे ऐकिवात नाही. यंत्रमाग कामगार मात्र त्यांना अधिक पगार मिळावा, यासाठी ८ तासांपेक्षा अधिक काम करतात, तशी मागणी कामगार वर्गाचीच आहे.- सतीश कोष्टी, अध्यक्ष, इचलकरंजी पॉवरलूम विव्हर्स असोसिएशन.