शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी विद्यापीठातील संगणक प्रणालीवरील ‘सायबर’ हल्ल्याचा प्रयत्न हाणून पाडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 17:17 IST

शिवाजी विद्यापीठाच्या संगणक प्रणालीवर चीनमधील हॅकर्सकडून सायबर हल्ला करण्याचा प्रयत्न दि. १४ सप्टेंबरला झाला. हा प्रयत्न विद्यापीठाच्या संगणक केंद्राने हाणून पाडला आहे. विद्यापीठातील माहिती सुरक्षित असल्याचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी शुक्रवारी सांगितले.

ठळक मुद्देसंगणक प्रणालीवरील ‘सायबर’ हल्ल्याचा प्रयत्न हाणून पाडलाशिवाजी विद्यापीठातील माहिती सुरक्षित : देवानंद शिंदे

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या संगणक प्रणालीवर चीनमधील हॅकर्सकडून सायबर हल्ला करण्याचा प्रयत्न दि. १४ सप्टेंबरला झाला. हा प्रयत्न विद्यापीठाच्या संगणक केंद्राने हाणून पाडला आहे. विद्यापीठातील माहिती सुरक्षित असल्याचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी शुक्रवारी सांगितले.कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, विद्यापीठाच्या विविध विभागांमध्ये माहिती व तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळाला रोज सुमारे साडेतीन लाख वापरकर्ते (युझर) भेट (हिटस्) देतात. विद्यापीठाच्या संगणक प्रणालीवर दि. १४ सप्टेंबरला सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सायबर ट्राफिक दिसून आले. त्यासह प्रणालीचा वेग काहीसा मंदावल्याचे दिसून आले. असा प्रकार अधून-मधून वारंवार घडत असल्याने त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. पण, काहीवेळात वेग मंदावण्याचे प्रमाण वाढले.

संगणक प्रणालीवर सायबर हल्ल्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून आले. त्यावर संगणक केंद्रातील तज्ज्ञांनी तातडीने सुरक्षाप्रणालीच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ केली. त्याच्या जोरावर सायबर हल्ल्याचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला.

आपली फायरवॉल ही प्रणाली सक्षम आहे. त्यासह सायबर ट्राफिकचे लॉग अ‍ॅनालेसिस नियमितपणे केले जात असल्याने हॅकर्सला संगणकप्रणालीत प्रवेश करता आला नाही. लोकेशन्स् आणि लॉग अ‍ॅनालेसिसवर पाहता या हल्ल्याचा प्रयत्न चायनामधून झाल्याचे दिसून येते.

या हल्ल्याच्या प्रयत्नामुळे विद्यापीठातील माहितीला कोणताही धोका पोहोचलेला नाही. सर्व माहिती सुरक्षित आहे. विद्यार्थी, प्राध्यापकांसह विद्यापीठाच्या घटकांनी काळजी करू नये.

‘हिट्स’ जादा असलेल्या ठिकाणी हल्लाहिट्स जादा असणाऱ्या, परिणामकारकता अधिक असलेल्या संगणकप्रणाली, संकेतस्थळांवर हॅकर्सकडून सायबर हल्ला केला जातो. त्यासाठी हॅकर्सकडून सॉफटवेअर रोबोटचा वापर केला जातो. हे रोबोटस् कोणत्या संगणकप्रणालीचे कोड वीक आहेत अथवा पाथ खुले आहेत. त्याचा शोध घेऊन संबंधित माहिती हॅकर्संना उपलब्ध करून देतात.

एखाद्या संस्था, व्यक्तीची बदनामी करणे, माहितीची चोरी करणे, नाहक त्रास देण्याच्या उद्देशाने असे सायबर हल्ले होतात. विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील रोजच्या हिटस्ची संख्या जादा असल्याने सायबर हल्ल्याचा प्रयत्न झाला असल्याची शक्यता संगणकशास्त्राचे विभागप्रमुख डॉ. आर. के. कामत यांनी व्यक्त केली.

दक्षता घेणे आवश्यकविद्यापीठाला सायबर सिक्युरिटीमधील संशोधनासाठी केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास विभागाकडून सात कोटी रुपयांचे अनुदान जाहीर झाले. याठिकाणी सायबर सुरक्षेचे सेंटर आॅफ एक्सलन्स् होणार असल्याने विद्यापीठाने दक्षता घेणे आवश्यक आहे. 

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर