कोल्हापूर : मास्क नसणाऱ्या किमान १५ नागरिकांवर कारवाई करूनच सायंकाळी कायार्लयात माघारी परता, अशी सक्ती केएमटीमधील पथकातील कर्मचाऱ्यांवर वरीष्ठांकडून केली जात आहे. पावत्या केल्या नाहीत तर तुमच्या विरोधात रिपोर्ट करू, अशी धमकीही दिली जात आहे. वरिष्ठांच्या आदेशामुळे येथील कर्मचारी दबावात आहेत.कोरोना असल्यामुळे प्रवासी संख्या कमी झाली असून, केएमटीने बसेस संख्या कमी केली आहे. यामुळे चालक आणि वाहकांना काम मिळत नाही. या पार्श्वभूमीवर महापालिकेने मास्क नसणाऱ्यांवर कारवाईसाठी केएमटीचे पथक नियुक्त केले. या मागे कर्मचाऱ्यांना काम आणि कोरोनावर नियंत्रण असा दुहेरी उद्देश आहे. १८ पथकामार्फत कारवाई सुरू असून चालक, वाहक असे १०० कर्मचारी नियुक्त केले आहेत.सध्या बहुतांशी नागरिकांकडून महापालिकेच्या सर्व नियमांचे पालन केले जात आहे. जुन ते सप्टेंबरच्या तुलनेत मास्क, सोशल डिस्टन्स, हँडग्लोज न घालणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. परिणामी केएमटी पथकाला कारवाईवर मर्यादा येत आहेत. असे असताना वरिष्ठांकडून कारवाईसाठी उद्दिष्टे दिली आहेत. दिवसभरात किमान १५ नागरिकांवर कारवाई करण्याचे आदेश आहेत. आयुक्तांनीच सक्त ताकीद दिली असल्याचा दाखला त्यांच्याकडून दिला जात आहे. दिवसभरात मास्क नसणारे कोणी आढळलेच नाही तर आमचा काय दोष आहे, अशी प्रतिक्रिया पथकातील कर्मचाऱ्यांतून व्यक्त होत आहे.
रोज मास्क नसणाऱ्या १५ जणांवर कारवाई करण्याची सक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2020 12:30 IST
commissioner, muncipaltyCarporation, kolhapurnews मास्क नसणाऱ्या किमान १५ नागरिकांवर कारवाई करूनच सायंकाळी कायार्लयात माघारी परता, अशी सक्ती केएमटीमधील पथकातील कर्मचाऱ्यांवर वरीष्ठांकडून केली जात आहे. पावत्या केल्या नाहीत तर तुमच्या विरोधात रिपोर्ट करू, अशी धमकीही दिली जात आहे. वरिष्ठांच्या आदेशामुळे येथील कर्मचारी दबावात आहेत.
रोज मास्क नसणाऱ्या १५ जणांवर कारवाई करण्याची सक्ती
ठळक मुद्देरोज मास्क नसणाऱ्या १५ जणांवर कारवाई करण्याची सक्ती केएमटी पथकातील कर्मचाऱ्यांसमोर अडचण