शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

गाण्याला साथसंगत करताना पोषक वातावरण तयार करा

By admin | Updated: April 28, 2015 00:47 IST

अरविंद मुळगावकर : कुडाळ येथे गप्पाटप्पा कार्यक्रम

कुडाळ : गाण्याला पोषक वादन आणि वादनातील गोडी या दोन गोष्टी ज्या तबलावादकाला साध्य झाल्या, तो खरा उस्ताद. तबलावादकाने गाण्याला साथसंगत करताना पोषक वातावरण निर्माण करावे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय किर्तीचे तबलावादक पं. अरविंद मुळगावकर यांनी कु डाळ येथील साहित्यिक आरती प्रभू यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित केलेल्या कार्यक्रमात केले. कुडाळ येथील आरती प्रभू कला अकादमीच्यावतीने साहित्यिक आरती प्रभू यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कुडाळ हायस्कूलच्या सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपस्थित संगीतप्रेमींसोबत रंगलेल्या गप्पाटप्पांच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुळगावकर यांची मुलाखत इंद्रजीत सावंत यांनी घेतली. यावेळी पं. मुळगावकर म्हणाले, आपल्याला लहानपणापासूनच तबलावादनाची आवड होती. तबला वादन क्षेत्रामध्येच उल्लेखनीय कामगिरी करण्याचे माझे उद्दिष्ट होते. पुढे मुंबईत स्थायिक असलेले व सिंधुदुर्गचे सुपुत्र रामकृष्ण उर्फ दादा दाभोलकर यांच्याशी ओळख झाल्यानंतर त्यांच्यामुळेच तबला उस्ताद अलारखाँ यांच्यासारख्या दिग्गज कलाकाराच्या संपर्कात आलो, असे मुळगावकर यांनी सांगितले. त्यानंतर तबला उस्ताद अमीर हुसेन खाँ यांचे तबलावादन ऐकण्याची संधी मिळाली. त्यांची तबल्यावर थिरकणारी बोटे पाहून भारावून गेलो आणि त्यांनाच गुरू मानून त्यांचे शिष्यत्त्व स्वीकारले. भाई तळेकर यांच्या हस्ते पं. मुळगावकर यांचे स्वागत करण्यात आले. तर ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक चंदू शिरसाट यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आनंद वैद्य, केदार सामंत, संस्थेचे पदाधिकारी व संगीतप्रेमी उपस्थित होते.कार्यक्रमाची सांगता कुडाळ येथील युवा तबलावादक सिध्देश कुंटे याच्या तबलावादनाने झाली. प्रास्ताविक आनंद वैद्य, आभार अणावकर यांनी मानले. (प्रतिनिधी)गंडाबंधन दोरा ठेवलाय जपून : मुळगावकर तबला उस्ताद अमीर हुसेन खान यांनी ७७ वर्षांपूर्वी बांधलेला गंडाबंधनाचा दोरा अजूनही जशास तसा जपून ठेवल्याचे यावेळी पं. मुळगावकर यांनी सांगितले. यावेळी आयोजक आणि उपस्थित संगीतप्रेमींच्या आग्रहास्तव पं. मुळगावकर यांनी आपले तबलावादन करून तबलावादनातील विविध अंगांचे दर्शन घडविले.