शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

नर्सरी बागेतील शाहू समाधीचे काम लवकर पूर्ण करु : आयुक्त कलशेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 16:11 IST

कोल्हापूर येथील नर्सरी बागेत उभे करण्यात येत असलेल्या शाहू समाधी स्मारकाचे काम सत्तर टक्के पूर्ण झाले असून उर्वरित काम देखील पुढील काही महिन्यात जलदगतीने केले जाईल, असे महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी गुरुवारी महापालिकेत झालेल्या बैठकीत सांगितले. स्मारक परिसरात करण्यात येणाऱ्या लॅँडस्केपिंग तसेच इलेक्ट्रीफिकेशनची सत्तर लाखाची कामे येत्या वीस दिवसात सुरु केली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ठळक मुद्देशाहू समाधीचे काम लवकर पूर्ण करु : आयुक्त कलशेट्टी

कोल्हापूर : येथील नर्सरी बागेत उभे करण्यात येत असलेल्या शाहू समाधी स्मारकाचे काम सत्तर टक्के पूर्ण झाले असून उर्वरित काम देखील पुढील काही महिन्यात जलदगतीने केले जाईल, असे महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी गुरुवारी महापालिकेत झालेल्या बैठकीत सांगितले. स्मारक परिसरात करण्यात येणाऱ्या लॅँडस्केपिंग तसेच इलेक्ट्रीफिकेशनची सत्तर लाखाची कामे येत्या वीस दिवसात सुरु केली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.महापौर सरीता मोरे यांनी शाहू समाधी स्मारकाच्या कामाचा आढावा घेण्याकरीता वरिष्ठ अधिकारी,पदाधिकारी, समिती सदस्य यांची संयुक्त बैठक आयोजित केली होती, त्यावेळी आयुक्त कलशेट्टी यांनी स्मारकाच्या कामाची सद्यस्थिती सांगितली.समाधी स्मारकाचे काम सध्या कुठेपर्यंत आले आहे याची माहिती देण्याची सुचना महापौर मोरे यांनी अधिकाऱ्यांना केली. तेंव्हा शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांनी सांगितले की, स्मारकाचा चबुतरा, समाधी, मेघडंबरी संबंधिची एक कोटी आठ लाखाचे काम पूर्ण झाले आहे. कंपौडवॉलचे एक कोटी दोन लाखाचे काम सध्या सुरु असून तेही पूर्णत्वाकडे चालले आहे.

समाधी परिसरात करण्यात येणाऱ्या लॅँडस्केपिंग तसेच इलेक्ट्रीफिकेशनची ७० लाखाची कामे येत्या वीस दिवसात सुरु केली जातील. या कामाची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. परंतु निवडणूक आचारसंहितेमुळे पुढील वर्कआॅर्डर देण्याचे काम थांबले आहे. २३ मे नंतर आचारसंहिता संपताच या सुध्दा कामास तातडीने सुरु करण्यात येईल.महापौर सरीता मोरे, माजी महापौर हसिना फरास, माजी नगरसेवक आदिल फरास, नंदकुमार मोरे यांनी या कामात आयुक्त कलशेट्टी यांनी स्वत: लक्ष घालून तातडीने पूर्ण होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. त्यावेळी शाहू महाराजांचे हे काम असल्याने सर्वांचीच जबाबदारी आहे. व्यक्तीश: मी या कामात लक्ष घालत आहे. प्रत्येक आठवड्याला कामाचा आढावा घेतला जाईल. लवकरात लवकर हे काम कसे पूर्ण होईल यासाठी प्रयत्न केले जातील, असे आयुक्तांनी सांगितले.शासनाकडे निधीचा पाठपुरावासमाधी स्मारक, संरक्षक भिंत, लॅँडस्केपिंग , इलेक्ट्रीफिकेशन शिवाय या स्मारकाच्या बाजूला असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृहाचे सुशोभिकरण, आर्टगॅलरीचे काम करण्याकरीता पाच कोटींचा आराखडा तयार करण्यात आला असून हा निधी मिळावा म्हणून राज्य सरकारकडे प्रस्ताव देण्यात आला आहे. निवडणुक आचारसंहिता संपताच हा निधी मिळविण्यासाठी आयुक्तांनी प्रयत्न करावेत, असे महापौरांनी सुचविले. तेंव्हा आराखडा, प्रस्ताव माझ्याकडे मिळाला की मी त्याकरीता प्रयत्न करतो, असे कलशेट्टी यांनी सांगितले.या बैठकीस उपमहापौर भूपाल शेटे, शिक्षण सभापती अशोक जाधव, नगरसेविका मेहजबीन सुभेदार, अतिरीक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, समिती सदस्य वसंतराव मुळीक, इंद्रजीत सावंत, गणेशकुमार खेडके, ठेकेदार व्ही.के. पाटील उपस्थित होते. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर