शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

‘स्काऊट गाईड’च्या जागेवर अतिक्रमण झाल्याची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2019 13:26 IST

कसबा बावडा रस्त्यावरील मेरी वेदर मैदानावरील भारत स्काऊट गाईड संस्थेच्या जागेवर जिल्हा लॉन असोसिएशन अतिक्रमण करत असल्याची तक्रार जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे करण्यात आली आहे. याबाबत तातडीने दखल घेऊन, योग्य ती कारवाई न झाल्यास स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांना घेऊन आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संस्थेचे जिल्हा चिटणीस प्राचार्य विलास पोवार व जिल्हा कमिशनर शोभा तावडे यांनी पत्रकार परिषदेत दिला.

ठळक मुद्दे‘स्काऊट गाईड’च्या जागेवर अतिक्रमण झाल्याची तक्रारजिल्हाधिकारी, आयुक्तांकडे कारवाईची मागणी

कोल्हापूर : कसबा बावडा रस्त्यावरील मेरी वेदर मैदानावरील भारत स्काऊट गाईड संस्थेच्या जागेवर जिल्हा लॉन असोसिएशन अतिक्रमण करत असल्याची तक्रार जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे करण्यात आली आहे. याबाबत तातडीने दखल घेऊन, योग्य ती कारवाई न झाल्यास स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांना घेऊन आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संस्थेचे जिल्हा चिटणीस प्राचार्य विलास पोवार व जिल्हा कमिशनर शोभा तावडे यांनी पत्रकार परिषदेत दिला.सरकारची मालकी असलेल्या १0 एकर क्षेत्रातील मेरी वेदर ग्राऊंड नाममात्र भाड्याने ९९ वर्षांच्या कराराने जिल्हा होमगार्ड, सैनिक कल्याण व स्काऊट गाईड या तीन संस्थांना दिली आहे. मालकी सरकारची असली तरी त्याची देखभाल दुरुस्ती महानगरपालिका प्रशासनाने करायची आहे. १९९२ मध्ये जिल्हा लॉन असोसिएशनने तेथील ३०० बाय ६०० क्षेत्राची जागा घेतली. ती जागा त्यांनी कंपौंड वॉल बांधून बंदिस्त केली.

काही वर्षांपूर्वी आणखी जागा घेण्याचा संस्थेने प्रयत्न केला, तेव्हा शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी आंदोलन करून तो प्रयत्न हाणून पाडला. आता गेल्या दोन-तीन दिवसांपासून पुन्हा असा प्रयत्न होत आहे. १२ फूट उंचीचे कुंपण घातले जात आहे. त्याविरोधात स्काऊट गाईट संस्थेने जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. तक्रार करूनदेखील कारवाई झालेली नाही. तसेच त्याची दखलही घेतलेली नाही.मैदानाची जागा बंदिस्त करू नये, ती मोकळीच ठेवली पाहिजे. जर अतिक्रमण काढले नाही, तर आम्हाला दाद मागण्यासाठी जनआंदोलन करावे लागेल, तसेच न्यायालयातही जावे लागेल, असा इशारा प्राचार्य विलास पोवार यांनी दिला. महानगरपालिका शिक्षण सभापती अशोक जाधव यांनी  प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. महापालिकेचे तसेच खासगी अनुदानित शाळांतील विद्यार्थी येथे स्काऊट गाईडचे शिक्षण घेत असून, त्यांची जागा कोणी बळकावणार असेल, तर त्याविरोधात रस्त्यावर यावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर