शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

सावकारांविरोधात तक्रार द्या

By admin | Updated: March 26, 2016 00:25 IST

पोलिसांकडून आवाहन : सावकारांवर कठोर कारवाई होणार

कोल्हापूर : दहा ते तीस टक्के व्याजाने कर्जपुरवठा करून तिपटीने व्याज वसूल करणारे खासगी सावकार वसुलीसाठी तगादा लावत असतील, दमदाटी करीत असतील तर त्यांच्या विरोधात निर्भयपणे नागरिकांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते यांनी शुक्रवारी केले. दरम्यान, बांधकाम व्यावयायिक अमोल पवार याच्या जबाबावरून शुक्रवारी दिवसभर प्रकाश रमेश टोणपे, स्वरूप किरण मांगले, रणजित अशोक चव्हाण या तिघा सावकारांकडे कसून चौकशी केली. चौकशीमध्ये काही सावकार दोषी आढळले असून, त्यांच्या विरोधात लवकरच गुन्हे दाखल करणार असल्याचेही निरीक्षक मोहिते यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. आजरा-आंबोली मार्गावर हाळोली फाट्यानजीक आय-२० कारसह जळालेल्या स्थितीत सापडलेल्या मृतदेहाचे गूढ स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उकलून या प्रकरणी कटाचा सूत्रधार अमोल पवार व त्याचा भाऊ विनायक या दोघांना अटक केली. त्यांच्याकडे चौकशी केली असता, कोल्हापूर शहर व उपनगरांतील खासगी सावकारांकडून त्यांनी सुमारे तीन कोटी ६० लाख रुपये कर्ज घेतल्याचे निष्पन्न झाले. या सावकारांनी या रकमेवर दहा ते तीस टक्के व्याजाने वसुलीचा तगादा लावून पवार बंधूंना भंडावून सोडले होते. त्यांच्या त्रासाला कंटाळून आपल्या मृत्यूचा बनाव करून सेंट्रिंग कामगाराचा खून केल्याची कबुली त्यांनी पोलिस चौकशीत दिली होती. त्यानुसार पोलिसांनी संशयित खासगी सावकार प्रकाश रमेश टोणपे, सतीश गणपतराव सूर्यवंशी, दत्ता नारायण बामणे, रमेश लिंबाजी टोणपे, स्वरूप किरण मांगले, अशोक बाबूराव तनवाणी, प्रफु ल्ल अण्णासो शिराळे, सूरज हणमंत साखरे, नीलेश जयसिंगराव जाधव, पांडुरंग अण्णासो पाटील, रणजित अशोक चव्हाण, बिपीन ओमकारलाल परमार, अण्णा खोत, जयसिंगराव जाधव, प्रशांत सावंत (बेळगाव), आदी सावकारांना समन्स पाठवून चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले. गेल्या चार दिवसांपासून या सावकारांकडे कसून चौकशी सुरू आहे. चौकशीमध्ये या सावकारांनी कोट्यवधी रुपयांची मालमत्ता मिळविल्याचे पुढे आले आहे. (प्रतिनिधी)दोषी सावकारांना लवकरच अटकचौकशीमध्ये शुक्रवारी दिवसभर प्रकाश टोणपे, स्वरूप मांगले, रणजित चव्हाण या तिघा सावकारांकडे कसून चौकशी केली. आतापर्यंतच्या चौकशीमध्ये काही सावकार दोषी आढळले असून, त्यांच्यावर लवकरच गुन्हे दाखल करून अटक केली जाईल, असेही मोहिते यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.