शहरं
Join us  
Trending Stories
1
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
2
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
3
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
4
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
5
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

स्पर्धा परीक्षांमध्ये वाढला मराठीचा टक्का

By admin | Updated: February 27, 2015 00:18 IST

मराठी राजभाषा दिन विशेष : शासनाने दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून द्यावीत

इंदुमती गणेश - कोल्हापूर -शासकीय, प्रशासकीय सेवांमध्ये रुजू होण्यासाठी आवश्यक असलेल्या स्पर्धा परीक्षांमध्ये आता मराठीचा टक्का वाढतोय. एकेकाळी ‘स्पर्धा परीक्षा नको रे बाबा’ असा सूर असायचा. मात्र, गेल्या पाच-सात वर्षांमध्ये आयएएस, आयपीएस, एनडीए, सीडीएस, आयएफएस, एसएसबी अशा विविध क्षेत्रांत वर्षाला महाराष्ट्रातून शंभरपेक्षा अधिक विद्यार्थी उत्तीर्ण होतात. त्यात मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. त्यातही ‘एनडीए’मध्ये हे उत्तीर्णचे प्रमाण जास्त आहे. एमपीएससी आणि यूपीएससी परीक्षांबद्दल असलेल्या गैरसमजांमुळे विद्यार्थ्यांकडून डॉक्टर, इंजिनिअर अशा रुळलेल्या वाटा धुंडाळल्या जात. यातील काही गैरसमज असे की, या परीक्षा देणारे विद्यार्थी मुळातच हुशार असले पाहिजेत. त्यामुळे मराठी माध्यमातील व सर्वसामान्य विद्यार्थी या सेवाक्षेत्रांकडे पाठ फिरवायचे. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. मराठीतून अभ्यासाची सोय झाल्याने शहरीसोबत ग्रामीण भागातील विद्यार्थीदेखील मोठ्या संख्येने परीक्षेला बसतात. शहरातील दहा विद्यार्थ्यांच्या प्रमाणात ग्रामीण भागातून किमान पाच विद्यार्थी असा रेशो आहे. त्यातही बहुजन मुलांची संख्या अधिक, असा ‘आउटलुक’ मासिकाचा अहवाल आहे. परीक्षा, मुलाखत मराठीतून पूर्वी ‘यूपीएससी’ची परीक्षा इंग्रजी आणि हिंदी अशा दोनच माध्यमांतून घेतली जात होती. आता मात्र त्यात प्रादेशिक भाषेचा समावेश करण्यात आला आहे. जर तुम्ही मराठी किंवा त्या राज्याच्या स्थानिक भाषेच्या परीक्षेत उत्तीर्ण झालात, तरच पुढचे पेपर तपासले जातात. परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच्या मुलाखतीत प्रश्नांची उत्तरेदेखील तुम्ही मराठीतून देऊ शकता.गुणवत्ता सिद्ध करणारे एकमेव क्षेत्र अन्य कोणत्याही क्षेत्रात तुम्ही कितीही गुणवत्ताधारक असलात तरी तेथील आर्थिक गणिते किंवा वशिला अशा प्रकारांमुळे तुमची वर्णी लागेलच असे सांगता येत नाही. मात्र स्पर्धा परीक्षा हे एकमेव क्षेत्र आहे, जिथे तुम्ही तुमची गुणवत्ता सिद्ध करू शकता. स्टाफ सिलेक्शन, महसूल, आयकर विभाग, उत्पादन शुल्क, डाटा एंट्री ते अगदी आयएएस, आयपीएसपर्यंतच्या पदांवर कोणताही अन्याय किंवा अडचण न होता नोकरी लागते.स्पर्धा परीक्षांमध्ये माध्यम हा मुद्दा खरं तर गौण ठरतो. विद्यार्थ्यांची गुणवत्ता, शिकण्याची तयारी असेल तर मराठी माध्यमातील विद्यार्थीही इंग्रजीत अग्रेसर असतात. अशी प्रेरणादायी उदाहरणं आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांना प्राधान्य द्यायला हवे. - सुनेत्रा पाटील,संचालक, प्री-आयएएस ट्रेनिंग सेंटरमराठी विद्यार्थ्यांना इंग्रजीबद्दल न्यूनगंड असायचा; पण आता तशी परिस्थिती नाही. दर्जेदार पुस्तके उपलब्ध होत आहेत. ‘नोकरी संदर्भ’ किंवा ‘के. सागर’ अशा विविध प्रकाशनांमुळे तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत माहिती आणि साहित्य पोहोचते; त्यामुळे अशा परीक्षांत मराठी विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढले. - सुहासराजे भोसले (नोकरी संदर्भ)मागच्या मेन्स परीक्षेत ८० विद्यार्थी पास झाले. त्यांपैकी सात ते आठ विद्यार्थी मराठी माध्यमातील होते. आता प्रशासकीय सेवाक्षेत्राच्या दिशेने विद्यार्थ्यांचे पाऊल पडले आहे. त्यांना अभ्यासासाठी दर्जेदार पुस्तके मिळावीत, ही शासनाची जबाबदारी आहे. - जॉर्ज क्रूझ, मार्गदर्शक