शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

समाजउत्थान पुरस्कार जाहीर

By admin | Updated: May 23, 2017 01:13 IST

साळुंखे, देशमुख मानकरी : उद्या वितरण, सहा संस्थाना शाहू, फुले, आंबेडकर पारितोषिक

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने देण्यात येणारे शाहू, फुले, आंबेडकर पारितोषिक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजउत्थान पुरस्कारांचे उद्या, बुधवारी येथे वितरण करण्यात येणार आहे. या पुरस्कार विजेत्यांची घोषणाही करण्यात आली असून येथील स्वामी विवेकानंद संस्थेचे अभयकुमार साळुंखे व चंदगड तालुक्यातील चिंचणे (पो. राजगोळी खुर्द) येथील पांडुरंग देशमुख हे समाजउत्थान पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त रवींद्र कदम पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये सकाळी ९.३० वाजता महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील व सामाजिक न्यायविभागाचे मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होईल तर या विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्यासह जिल्ह्णातील खासदार व आमदारांची यावेळी प्रमुख उपस्थिती असेल. राज्यातील सामाजिक न्याय क्षेत्रात अविरत काम करणाऱ्या संस्थांना शाहू, फुले, आंबेडकर पारितोषिक देऊन गौरविण्यात येते. राज्यातील सहा विभागांतील प्रत्येकी एक या प्रमाणे सहा संस्थांना प्रत्येकी १५ लाख, स्मृतिचिन्ह आणि मानपत्रही देण्यात येते तसेच डॉ. आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त सामाजिक न्याय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या १२५ जणांना डॉ. आंबेडकर समाजउत्थान पुरस्कार देण्याचे नियोजन करण्यात आले होते. प्रत्येकी २५ हजार रुपये व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पत्रकार परिषदेला विशेष अधिकारी विशाल लोंढे, प्रमोद फडणीस उपस्थित होते. मसूद माले, इचलकरंजी येथेही कार्यक्रमबुधवारी दुपारी ३ वाजता पन्हाळा तालुक्यातील मसूद माले येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठी शासकीय निवासी शाळेचे उद्घाटन करण्यात येणार आहे तसेच सायंकाळी ६ वाजता इचलकरंजी येथील नवीन मुलींच्या शासकीय वसतिगृहाचे प्रमुख मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.काँग्रेसच्या माजी मंत्र्यांना पत्रिकेत स्थानकाँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी शासनातील समाजकल्याण मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या मूळ गावी मसूद माले येथे शासकीय निवासी शाळा सुरू होत आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन पत्रिकेत हंडोरे यांनाही स्थान देण्यात आले आहे. या शाळेच्या मंजुरीकामी तसेच जागेसाठी हंडोरे यांनी सहकार्य केले होते. त्यासाठीच त्यांनाही पत्रिकेत स्थान देण्याचे सांगण्यात आले. काँग्रेसच्या माजी मंत्र्यांना पत्रिकेत स्थानकाँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी शासनातील समाजकल्याण मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या मूळ गावी मसूद माले येथे शासकीय निवासी शाळा सुरू होत आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन पत्रिकेत हंडोरे यांनाही स्थान देण्यात आले आहे. या शाळेच्या मंजुरीकामी तसेच जागेसाठी हंडोरे यांनी सहकार्य केले होते. त्यासाठीच त्यांनाही पत्रिकेत स्थान देण्याचे सांगण्यात आले. सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ (रत्नागिरी मु. पो. जालगाव, ता. दापोली, जि. रत्नागिरी)महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था (कर्वे नगर, पुणे)केशव स्मृती प्रतिष्ठान (जळगाव)शिवप्रभू बहुउद्देशीय क्रीडा, शिक्षण सांस्कृतिक मंडळ (बुलढाणा)लॉर्ड बुद्धा मैत्रीय संघ, डग्लस हॉस्पिटलजवळ (नागपूर)सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ द्वारा, डॉ. हेडगेवार रुग्णालय (गारखेडा, औरंगाबाद)