शहरं
Join us  
Trending Stories
1
Nagpur Rains: विदर्भाला पावसाचा तडाखा! नागपूरमध्ये घरांमध्ये पाणी, शाळांना सुट्टी; पुरामुळे अनेक ठिकाणी संपर्क तुटला
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
टेस्ट पासून का रे दूरावा? किंग कोहली म्हणाला; दाढी पिकली रे भावा!
4
FD पेक्षा जास्त परतावा, पण शेअर बाजाराचा धोका नको? आता 'हा' फंड देणार दुप्पट परतावा?
5
'...तर मी राजकारण सोडेन', नितीश कुमारांबाबत प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी
6
२० रुग्णालये, १३,००० कर्मचारी हे आहेत भारतातील सर्वात श्रीमंत डॉक्टर, एवढी आहे संपत्ती
7
हनुमान चालीसा बोलायचा राशिद, गर्लफ्रेंड झाली फिदा; पण तिथूनच सुरू झाला नवा कांड, युवती...
8
"साहेब, बायको पळाली"; ४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार; पतीची पोलिसांकडे धाव! म्हणाला... 
9
'या' आयपीओचं तुफान लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल; शेअर्स खरेदीची लूट
10
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
11
खळबळजनक! प्रायव्हेट व्हिडीओ दाखवून ३ कोटी उकळले अन् धमकावलं, CA ने आयुष्य संपवलं
12
आरारा....खतरनाक; कमी किमतीत स्मार्ट फीचर्स; Mahindra ने लॉन्च केली सर्वात SUV
13
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
14
'धुरंधर'मध्ये दिसलं पाकिस्तान, कुठे शूट झाले हे सीन्स? रणवीर सिंहच्या सिनेमाची चर्चा
15
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
16
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
17
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
18
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
19
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
20
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट

‘डिजिटल’चे धोरण ठरवण्यास समिती

By admin | Updated: January 19, 2015 00:28 IST

इचलकरंजी नगरपालिका : अनधिकृत होर्डिंग्ज, फलक जप्तीचे आदेश

इचलकरंजी : शहरात विविध अशा मोक्याच्या ठिकाणी उभारण्यात येणारे होर्डिंग्ज व डिजिटल फलक लावण्यासाठी धोरण ठरविण्याकरिता नागरिकांची एक समिती नेमण्याचा निर्णय नगरपालिकेत झालेल्या एका बैठकीत घेण्यात आला. पालिका सभागृहात झालेल्या बैठकीमध्ये शहरात असणारे अनधिकृत फलक ताबडतोब हलविण्याचा आणि ते जप्त करण्याचा आदेश मुख्याधिकारी सुनील पवार यांनी दिला.शहरामध्ये विविध ठिकाणी असलेल्या फलकांच्या जागेचा अनधिकृत वापर केला जात आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये सर्व व्यापक बैठकीत ठोस धोरण घेण्यासाठी पालिकेच्या सभागृहात ही बैठक घेण्यात आली. बैठकीसाठी नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे, उपनगराध्यक्ष रणजित जाधव, पाणीपुरवठा सभापती रवी रजपुते, आरोग्य समितीच्या सभापती सुजाता भोंगाळे, नगरसेविका बिस्मिल्ला मुजावर, रत्नप्रभा भागवत, हेमलता आरगे, पारूबाई चव्हाण, शकुंतला मुळीक, सुरेखा इंगवले, आक्काताई कोटगी, माधुरी चव्हाण, छाया पाटील, रेखा रजपुते, सामाजिक कार्यकर्ते दिलीप माणगावकर, अभिजीत पटवा, सुरेश गडगे, किरण माळी, माकपचे सदा मलाबादे, आदी उपस्थित होते.शहरामध्ये असलेल्या होर्डिंग्ज आणि डिजिटल फलकांसाठी असलेल्या कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. होर्डिंग्ज व फलकांचा वापर व्यावसायिक जाहिरातींसाठी करण्यात यावा. शाळेच्या शंभर मीटर अंतरापर्यंत फलक लावण्यास मंजुरी नसावी. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींचे वाढदिवसाचे फलक लावण्यास मनाई करावी. महापुरूषांची छायाचित्रे असलेले फलक लावण्याची जबाबदारी संबंधित फलक लावणाऱ्यांची असावी, आदी प्रकारच्या सूचना या बैठकीत करण्यात आल्या.यानंतर मुख्याधिकारी पवार म्हणाले, नगरपालिकेच्यावतीने लवकरच अनधिकृत फलकांची माहिती देण्यासाठी टोल फ्री नंबर सुरू करण्यात येणार आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार माहिती पुरविणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, तर सध्या शहरात असलेले अनधिकृत होर्डिंग्ज व फलक ताबडतोब काढून टाकले जातील आणि जप्त करण्यात येतील. (प्रतिनिधी)फलकाने शाळेची इमारत झाकलीनगरपालिकेतील बैठकीत हा निर्णय चालू असतानाच शहरातील एका नामांकित शाळेसमोर ‘यशवंत’ समजणाऱ्या एका व्यक्तीचे मोठे चार डिजिटल फलक उभा करून शाळेची इमारतच झाकून टाकल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. विशेष म्हणजे याच शाळेच्या मैदानावर सदर व्यक्तीने (त्याच्या तथाकथित संस्थेने) एका कार्यक्रमाचे आयोजन केले असून, शाळेनेसुद्धा या कार्यक्रमास कोणत्या गुणवत्तेवर परवानगी दिली, याचीच चर्चा सुरू आहे.