शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

गडहिंग्लजमध्ये अद्ययावत स्टेडियम उभारणीसाठी वचनबद्ध । संजय मंडलिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 23:55 IST

गडहिंग्लजला फुटबॉलची गौरवशाली परंपरा आहे. गेली अनेक वर्षे राष्ट्रीय स्तरावरील फुटबॉलचे सामने या ठिकाणी होतात; परंतु याठिकाणी अजूनही अद्ययावत मैदान नाही. त्यामुळे गडहिंग्लजला सुसज्ज स्टेडियम होण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करणार

ठळक मुद्दे‘युनायटेड फुटबॉल असोसिएशन’च्या पुरस्कारांचे वितरण

गडहिंग्लज : गडहिंग्लजला फुटबॉलची गौरवशाली परंपरा आहे. गेली अनेक वर्षे राष्ट्रीय स्तरावरील फुटबॉलचे सामने या ठिकाणी होतात; परंतु याठिकाणी अजूनही अद्ययावत मैदान नाही. त्यामुळे गडहिंग्लजला सुसज्ज स्टेडियम होण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असून, त्यासाठी वचनबद्ध आहे, अशी ग्वाही खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी दिली.

गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनच्या शनिवारी झालेल्या ‘राष्ट्रीय फुटबॉल भूषण पुरस्कार’ वितरणप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार हसन मुश्रीफ होते. यावेळी ‘फिफा’ निदेशक मारियानो डायस, केएएसचे फुटबॉल सचिव प्रा. अमर सासने, उपनगराध्यक्ष सुनीता पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. पालिकेच्या शाहू सभागृहात हा कार्यक्रम झाला.याप्रसंगी राजस्थानचे रॉबिन झेवियर यांना ‘फुटबॉल भूषण’, पुसदच्या चेतना क्रीडा मंडळाला ‘जीवनगौरव’, तर कोल्हापूरच्या कुणाल चव्हाणचा ‘प्रतिभावान खेळाडू’ म्हणून गौरव करण्यात आला. यावेळी सौरभ पाटील, प्रशांत सलवादे यांचाही विशेष गौरव करण्यात आला.यावेळी मंडलिक म्हणाले, जिल्ह्यात कोल्हापूरनंतर गडहिंग्लजमध्येच मोठ्या प्रमाणात फुटबॉल रुजला आहे. ‘युनायटेड खेळाडू’ राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचतात ही अभिमानाची बाब आहे.मुश्रीफ म्हणाले, गडहिंग्लजकरांच्या फुटबॉल वेडाचा मी साक्षीदार आहे. दिवाळीतील अखिल भारतीय स्पर्धांसाठी शौकिनांनी मैदान फुलून जाते. फुटबॉलला पाठबळ देण्यासाठी आपण तत्पर आहोत.

कार्यक्रमास युनायटेडचे अध्यक्ष संभाजी शिवारे, संचालक सतीश पाटील, महादेव पाटील, अ‍ॅड. सुरेश कुराडे, प्रशांत दड्डीकर, दीपक कुपन्नावर, सुभाष पाटील, रामचंद्र शिवणे आदी उपस्थित होते.युनायटेडचे सचिव यांनी प्रास्ताविक केले. यांनी आभार मानले.फुटबॉलने जगाला जोडले...!गडहिंग्लजसारख्या छोट्या शहरात सुरू असलेली फुटबॉलची दमदार वाटचाल प्रेरणादायी आहे. राजस्थानहून पुरस्कार स्वीकारण्यासाठी आलेलो असताना अव्वल गोव्याचे मार्गदर्शक या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत. यावरूनच फुटबॉल हा खेळ जगाला जोडत असल्याचे अधोरेखित झाल्याचे रॉबिन झेवियर यांनी आपल्या भाषणात नमूद केले.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFootballफुटबॉल