शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
3
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
4
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
6
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
7
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
8
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
9
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
10
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
11
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
12
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
13
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
14
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
15
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
16
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
17
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
18
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
19
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
20
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्तांकडून फुले रुग्णालयाचे ‘आॅपरेशन’

By admin | Updated: June 3, 2017 00:52 IST

आयुक्तांकडून फुले रुग्णालयाचे ‘आॅपरेशन’

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : अपुरे डॉक्टर, भरमसाट गैरसोयी, कर्मचाऱ्यांची मनमानी, रुग्णांची होणारी हेळसांड यामुळे टीकेचे लक्ष्य बनलेल्या सावित्रीबाई फुले रुग्णालयास शुक्रवारी दुपारी आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी अचानक भेट देऊन तेथील परिस्थितीचा अनुभव घेतला. स्वत: डॉक्टर असलेल्या चौधरी यांनी रुग्णालयातील अनास्था पाहून आरोग्याधिकारी, रुग्णालयाचे प्रमुख यांना चांगलेच फैलावर घेतले. तसेच रुग्णालयाच्या इमारतीच्या दुरुस्तीची झालेली ढिसाळ कामे पाहून आयुक्त भलतेच संतप्त झाले. त्यांनी संबंधित ठेकेदारावर थेट फौजदारीच दाखल करण्याचे आदेश दिले. आपत्ती व्यवस्थापनाच्या बुधवारी (दि. ३१) झालेल्या बैठकीत महापौरांसह काही पदाधिकाऱ्यांनी सावित्रीबाई फुले रुग्णालयातील अनास्थेबाबत स्वत: जाऊन पाहणी करून माहिती घ्या, अशी आयुक्तांना विनंती केली होती. त्यानुसार आयुक्त चौधरी यांनी शुक्रवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास रुग्णालयास अचानक भेट दिली. त्यानंतर त्यांनी आरोग्याधिकारी डॉ. अरुण परितेकर, वैद्यकीय अधिकारी प्रकाश पावरा, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना बोलावून घेतले. या सर्वांबरोबर त्यांनी रुग्णालयातील प्रत्येक विभागात जाऊन तेथील परिस्थितीचा अंदाज घेतला. सर्वप्रथम त्यांना प्रसूती विभागात भेट देऊन माहिती घेतली. प्रसूती कक्षातील गैरसोयींबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. तेथील इलेक्ट्रिक वायरिंग, भिंंतींचे रंग, अस्वच्छतेबाबत कर्मचाऱ्यांना फैलावर घेतले. रक्त व लघवीच्या तपासणी कक्षात आयुक्तांनी भेट दिली असता तेथील अस्ताव्यस्तपणा पाहून आयुक्त संतप्त झाले. त्यावेळी आयुक्तांनी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना लॅबजवळून जाणाऱ्या ड्रेनेजची दुरुस्ती करण्याची सूचना केली. सर्जिकल वॉर्डात जाऊन आयुक्तांनी रुग्णांशी चर्चा केली. त्यांनीही तेथील गैरसोयी निदर्शनास आणून दिल्या. रक्त व लघवीच्या तपासण्या येथे होत असताना बाहेरील पॅथॉलॉजी सेंटरची पत्रे दिली जातात. अशी माहिती रुग्णांनी दिली. त्यावेळी असे कोणी करीत असेल तर त्यांची चौकशी करून संबंधित डॉक्टरांना नोटीस काढा, असे आयुक्तांनी आरोग्याधिकाऱ्यांना सांगितले. ठेकेदारांवर फौजदारीचे आदेश छतावरील गळती काढण्याचे काम करण्यात आल्यानंतरही गळती सुरूच आहे. स्लॅबवर कोबा करीत असताना ड्रिल मशीनने तो फोडला असल्याने एकूण स्लॅबच धोकादायक बनला आहे. ही बाब आयुक्तांच्या लक्षात येताच ते डॉ. प्रकाश पावरा तसेच ठेकेदारावर भडक ले. ‘तुम्ही तुमच्या घरची कामे अशाच प्रकारे करून घेता काय?’ अशा शब्दांत त्यांना झापले. ठेकेदारांकडून पुन्हा ही कामे करून घ्या; शिवाय त्यांच्यावर फौजदारीही करा,’ असा आदेश त्यांनी दिला. जादा डॉक्टर नेमणाररुग्णालयाकडे डॉक्टरांची संख्या कमी असल्यामुळे कॉँट्रॅक्ट बेसवर आणखी काही डॉक्टर्स घेण्याचा प्रयत्न राहील. रुग्णालयाच्या दुरुस्तीच्या कामात बऱ्याच त्रुटी दिसून आल्या. त्या दुरुस्त करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत, असे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. गच्चीवर दारूच्या बाटल्या!रुग्णालयाचे छत गळत असल्याची गंभीर तक्रार समोर आल्यानंतर आयुक्त चौधरी यांनी गच्चीवर जाऊन पाहणी केली. त्या ठिकाणी अनपेक्षितपणे पाईपखाली दारूच्या बाटल्या आढळून आल्या. त्या पाहून चौधरी यांचा रागाचा पारा चढला. त्यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. ‘कोण हे उपद्व्याप करतो?’ अशी विचारणा केल्यावर रुग्णांचे नातेवाईक रात्रीच्या वेळी जेवणासाठी म्हणून वर जात असतात, असे उत्तर काही कर्मचाऱ्यांनी दिले.