शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
3
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
4
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
5
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
6
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
7
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
8
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
9
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
10
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
11
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
12
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
13
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
14
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
15
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
16
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!
17
अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..
18
"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?
19
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला

आयुक्तांवर अविश्वास ठराव दाखल करणार

By admin | Updated: July 25, 2015 01:13 IST

मुश्रीफ : कार्यक्रमास न आल्याने नगरसेवकांना आदेश

कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधिस्थळ कामाच्या प्रारंभास गैरहजर राहून शाहू महाराजांचा अवमान करणाऱ्या आयुक्त पी. शिवशंकर यांच्या विरुद्ध महापालिका सभेत अविश्वास ठराव दाखल करण्यात येणार आहे. तसा आदेशच आमदार हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना दिला. कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने नर्सरी बागेत राजर्षी शाहू महाराज यांचे समाधिस्थळ उभारण्यात येत असून, त्याच्या कामाचा प्रारंभ शुुुक्रवारी श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते व आमदार हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत झाला. या कार्यक्रमास मनपा आयुक्त पी. शिवशंकर गैरहजर होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शाहू महाराज यांनी, आयुक्त कुठे आहेत? अशी विचारणा आमदार मुश्रीफ यांच्याकडे केली. मुश्रीफ यांनी त्याचा संदर्भ भाषणात द्यायचा राहून गेला. आपल्या भाषणात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिकेसाठी किती निधी आणला, हे सांगितले. तसेच भाजप-शिवसेना नेते सत्तेत आल्यानंतरही एकमेकांवर आरोप करत बसले असल्याचे सांगितले. भाषण संपल्यावर मुश्रीफ खुर्चीवर जाऊन बसले आणि त्यांना आयुुक्तांची आठवण झाली. ते पुन्हा बोलायला उठले. माईकचा ताबा घेतला आणि बोलायला लागले. ‘आयुक्त कुठे आहेत? अशी विचारणा मला श्रीमंत शाहू महाराजांनी केली. आयुक्त शिवशंकर यांनी कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहायला पाहिजे होते; पण ते आले नाहीत. मागे एकदा असेच ते एका कार्यक्रमास आले नाहीत. जिल्ह्यात नवीन आयएएस अधिकारी आले आहेत. ते स्वत:ला ‘सुपिरर’ समजतात. आपण म्हणजे खूप शहाणे आहोत. आपण म्हणजे मालक आहोत, अशा थाटात ते वावरत असतात. आयुक्तांनी कार्यक्रमाला गैरहजर राहणे हा राजर्षी शाहू महाराजांचा अवमान आहे. महाराजांचा अवमान करणाऱ्या आयुक्तांची बदली झाली पाहिजे म्हणूनच सर्व नगरसेवकांनी त्यांच्या विरोधात येत्या महासभेत अविश्वासाचा ठराव दाखल करावा,’ असे आवाहन मुश्रीफ यांनी केले. काँग्रेसचे नेते सतेज पाटील सध्या परदेशात असून, ते कोल्हापुरात आल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करून आयुक्तांविरोधात अविश्वासाचा ठराव दाखल करण्यात येईल, असे राष्ट्रवादीचे गटनेते राजेश लाटकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)पूर्वकल्पना दिली होती माझी तब्येत बरी नसल्याने शाहू समाधिस्थळ कामाच्या प्रारंभास येऊ शकणार नाही, याची कल्पना आपण स्थायी समिती सभापती आदिल फरास यांना आधी दिली होती. शाहू महाराजांबद्दल मलाही आस्था आहे, म्हणूनच त्यांच्या समाधिस्थळाच्या कामाची तातडीने निविदा प्रक्रिया राबवून वर्कआॅर्डरही दिली होती. हे काम चांगले व्हावे यासाठी मी व्यक्तिश: प्रयत्न करत आहे. त्यामुळे कोणाचा गैरसमज नसावा. - पी. शिवशंकर, आयुक्त, कोमनपा