शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्तांनी साधला थेट पॉझिटिव्ह रुग्णांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 12:04 IST

महापालिकेच्या कोविड केअर सेंटरला आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी  अचानक भेटी दिल्या. पॉझिटिव्ह रुग्णांशी थेट संवाद साधत सुविधांबाबत विचारपूस केली रुग्णांना चांगले जेवण, चांगली सुविधा देण्याचे आदेश आयुक्तांनी संबंधितांना दिले. याठिकाणी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये याची खबरदारी सर्वांनी घेतली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देआयुक्तांनी साधला थेट पॉझिटिव्ह रुग्णांशी संवादकोव्हीड सेंटरला अचानक भेट : सुविधांबाबत केली विचारपूस

कोल्हापूर : महापालिकेच्या कोविड केअर सेंटरला आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी  अचानक भेटी दिल्या. पॉझिटिव्ह रुग्णांशी थेट संवाद साधत सुविधांबाबत विचारपूस केली रुग्णांना चांगले जेवण, चांगली सुविधा देण्याचे आदेश आयुक्तांनी संबंधितांना दिले. याठिकाणी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये याची खबरदारी सर्वांनी घेतली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.शिवाजी विद्यापीठ डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी सेंटरमध्ये वॉर्डबॉयने अलगीकरण कक्षातील अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन केल्याची तक्रार राजारामपुरी पोलिसांत दाखल झाली. यानंतर शहरातील अलगीकरण कक्ष आणि कोविड केअर सेंटर चर्चेचा विषय ठरले. या सर्व पार्श्वभूमीवर डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी, आयसोलेशन, शेंडा पार्क येथील आरोग्य प्रशिक्षण केंद्र व इतर ठिकाणी कोविड केअर सेंटरला आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी अचानक भेट दिली. त्यांनी तेथील पॉझिटिव्ह रुग्णांशी संवाद साधला. या ठिकाणी देण्यात येणाऱ्या सेवा-सुविधांबाबत चर्चा केली. सेंटरवरील सुविधेबाबत त्यांच्या काही सूचनाही ऐकून घेतल्या.

या ठिकाणी खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांना ज्याप्रमाणे आहार दिला जातो, त्याप्रमाणे येथील रुग्णांनाही आहार देण्याच्या सूचना नोडल ऑफिसर यांना केल्या. शौचालयांची व इतर स्वच्छता दैनंदिन होते का नाही, याची चौकशी केली. पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर, उपअभियंता टी. एस. कांबळे, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी प्रकाश पावरा, आदी यावेळी उपस्थित होते.दर जास्त घ्या; पण जेवण चांगले द्यारुग्णांना पोषक आहार द्या, ठेकेदारला प्रतिप्लेट २५ रुपये वाढवून द्यावेत, अशा सूचना आयुक्तांनी केल्या.साहेब, तुम्ही देवमाणूसस्वच्छता अभियानामुळे आयुक्त घराघरांत पोहोचले आहेत, त्यांच्याबद्दल कोल्हापूरकरांमध्ये आयुक्तांना आदराचे स्थान आहे. डीओटी कोविड केअर सेंटरमध्ये याची पुन्हा एकदा प्रचिती आली. येथील रुग्णाने साहेब, तुम्ही देवमाणूस आहात. आमचे प्रश्न सुटले. इथे काही अडचण नाही, असे सांगितले. आयुक्त लोकांसाठी रात्रंदिवस काम करीत असल्याची भावनाच त्यातून व्यक्त झाली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर