शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

(वाणिज्य...) होमिओपॅथी संशोधनाचे कार्य प्रभावीपणे मांडावे - डी. टी. शिर्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:22 IST

कोल्हापूर : हाेमिओपॅथी संशाेधनाचे कार्य संख्येच्या स्वरूपात अधिक प्रभावीपणे मांडणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. ...

कोल्हापूर : हाेमिओपॅथी संशाेधनाचे कार्य संख्येच्या स्वरूपात अधिक प्रभावीपणे मांडणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी केले. होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज एक्स स्टुडंट‌्स असोसिएशन (होमेसा)च्या वतीने आयोजित ‘होमेसाकॉन २०२१’ परिषदेत ते बोलत होते.

डॉ. शिर्के म्हणाले, होमिओपॅथस‌्नी आयुष्यभर नवनवे शिकत राहावे व स्वत:चे वैद्यकीय ज्ञान सतत अद्ययावत ठेवून संशोधनाशी नाते जोडले तर समाज आरोग्यदायी राहील. कोरोनाने मानवाला व्हर्च्युअल, ई-लर्निंग तसेच इंटरॅक्चुअल जगायला शिकवले.

यावेळी महाराष्ट्र विज्ञान विद्यापीठ नाशिकचे अधिष्ठाता डॉ. धनाजी बागल, डॉ. पृथ्वीराज मेथे (सांगली), डॉ. संतोष रानडे (कोल्हापूर), प्राचार्य डॉ. रोझारिओ डिसोझा, डॉ. मनीषा शर्मा (मुंबई), डॉ. पायल परमार (मुंबई) यांनी मार्गदर्शन केले. ‘होमेसा’चे प्रेसिडेंट डॉ. राजकुमार पाटील यांनी स्वागत केले. संयोजन सचिव डॉ. सुनेत्रा शिराळे यांनी ‘कोरोना - काहीही कायमचे टिकत नाही’ या परिषदेच्या संकल्पनेबाबत माहिती दिली. डॉ. राजेश कागले यांनी आभार मानले. परिषद यशस्वी होण्यासाठी डॉ. हिंमतसिंह पाटील, डॉ. सुहास पाटील, डॉ. अन्वर गंजेली, डॉ. हर्षवर्धन जगताप, डॉ. शीतल पाटील, डॉ. सुधीर जरे, आदींनी परिश्रम घेतले.

फोटो ओळी : होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज एक्स स्टुडंट‌्स असोसिएशन (होमेसा) च्या वतीने आयोजित ‘होमेसाकॉन २०२१’ परिषदेचे उद‌्घाटन कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. धनाजी बागल, डॉ. पृथ्वीराज मेथे, आदी उपस्थित होते. (फाेटो-२१०३२०२१-कोल-होमिओपॅथिक)