शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

सुधीर फडकेंवर चित्रपट येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 23:20 IST

समीर देशपांडे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : दिवंगत ज्येष्ठ संगीतकार, गायक सुधीर फडके यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती ...

समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : दिवंगत ज्येष्ठ संगीतकार, गायक सुधीर फडके यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती लवकरच सुरू केली जाणार आहे. कोल्हापूरच्या या सुपुत्राची अलौकिक कामगिरी चित्रपटबद्ध करण्यासाठीची प्राथमिक तयारीही सुरू झाली आहे. त्यांचे चिरंजीव श्रीधर फडके यांनीच कोल्हापुरात रविवारी ही माहिती दिली.कोल्हापूरमध्ये २५ जुलै १९१९ रोजी जन्मलेले रामचंद्र फडके हेच पुढे सुधीर फडके या नावाने लोकप्रिय झाले. अतिशय गरिबी, टप्प्याटप्प्याने होत गेलेली प्रतिकूल परिस्थिती, त्यातूनच उत्तर भारतामध्ये गाण्याचे कार्यक्रम करून झालेला उदरनिर्वाह आणि पुन्हा कोल्हापुरात आल्यानंतर पाध्येबुवांच्या या निष्ठावान शिष्याने घेतलेली झेप हा सर्व प्रवास सुधीर फडके यांनी आपल्या अर्धवट राहिलेल्या ‘जगाच्या पाठीवर’ या आत्मचरित्रामध्ये मांडला आहे.मात्र ‘वीर सावरकर’ या महत्त्वाकांक्षी चित्रपटासाठी त्यांनी आपले आत्मचरित्राचेही काम मागे ठेवले. २९ जुलै २00२ रोजी वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांचे निधन झाले; मात्र एकूणच थक्क करणारा त्यांचा जीवनप्रवास चित्रपटाच्या रूपाने रसिकांसमोर आणण्यासाठी आता प्रयत्न सुरू झाले आहेत.फडके यांचे आत्मचरित्र अपुरे असल्याने त्यांच्या मोठ्या प्रवासाची पुन्हा मांडणी करावी लागणार आहे. ही जबाबदारी अर्थातच त्यांचे चिरंजीव श्रीधर फडके यांनाच देण्यात आली आहे; त्यामुळे ही माहिती एकत्रित करणे, त्याच्या संदर्भांची खात्री करणे हे काम सुरू झाले आहे.प्रखर राष्ट्रभक्त आणि सच्चा गायक, संगीतकार अशी प्रतिमा असलेल्या या स्वरतीर्थाचा चित्रपटाच्या माध्यमातून दाखविला जाणारा प्रवास निश्चित सर्वांनाच प्रेरणादायी ठरणार आहे. याबाबतची सविस्तर माहिती देण्यात आली नसली, तरी असा चित्रपट होऊ घातला आहे, हीदेखील रसिकांसाठी आनंदवार्ताच आहे.बाबूजींच्या जीवनकार्यावर चित्रपट काढला जाणार आहे. काही मंडळींनी याबाबत तयारी सुरू केली आहे. अपुऱ्या आत्मचरित्रानंतरची माहिती मला जेवढी आहे, तेवढी मी देणार आहे. बाबूजींनी विविध क्षेत्रांत एवढं मोठं काम केलं, त्यांच्या जीवनामध्ये एवढ्या टोकाच्या बºयावाईट घटना घडल्या, की त्यांची निवड करणेही कठीण होत आहे.- श्रीधर फडके, गायक, संगीतकार