शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
4
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
5
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
6
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
7
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
8
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
9
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
10
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
11
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
12
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
13
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
14
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
15
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
16
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
17
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
18
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
19
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
20
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?

आरक्षणासाठी एकत्र या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 01:01 IST

पट्टणकोडोली : धनगर समाजाच्या हातात एसटीचा दाखला एका महिन्याच्या आत मिळाला नाही तर हे सरकार सत्तेवर येणार नाही. त्यामुळे ...

पट्टणकोडोली : धनगर समाजाच्या हातात एसटीचा दाखला एका महिन्याच्या आत मिळाला नाही तर हे सरकार सत्तेवर येणार नाही. त्यामुळे आरक्षण न देणाऱ्या सरकारला सळो की पळो करून सोडायची वेळ आली आहे. यासाठी समाजाने एकतेची मोट बांधून लढा द्यायला हवा, असे आवाहन धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी केले. पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील धनगर आरक्षण परिषदेत ते बोलत होते.धनगर समाजाच्या लोकसंख्येच्या आधारावरच आरक्षण मिळायला हवे, ‘जिसकी जितनी संख्या भारी, उसमे उसकी उतनी बारी’ असा नारा त्यांनी दिला. पाडळकर म्हणाले, धनगर समाजाच्या मतामुळेच भाजप सरकार सत्तेवर आले आहे. मात्र, सरकारने धनगर आरक्षणाच्या बाबतीत एकही कागद या टेबलावरून त्या टेबलावर सरकवलेला नाही. सरकारने केवळ समाजाची फसवणूक केली आहे. त्यामुळे भाजप सरकारला भीक न घालता धनगराच्या पोराच्या हातात एसटीचा दाखला मिळत नाही तोपर्यंत हा सरकारविरोधी लढा चालूच राहील. ही लढाई कोल्हापुरातून सुरू झाली आहे. आरक्षण मिळेपर्यंत सरकारच्या छाताडावर बसून लढा सुरूच राहील.आरक्षण परिषदेत उत्तमराव जानकर म्हणाले, आरक्षणाचा प्रश्न ७० वर्षांपासून तसाच राहिला आहे. त्यामुळे आता नेतृत्वाची स्पर्धा न करता एकीच्या बळाने ही समाजक्रांतीची लढाई अशीच चालू ठेवून धनगर आरक्षणाचा लढा जिंकायचा आहे. आता आम्हाला धनगर आरक्षण मिळाले नाही तर ‘अब की बार मोदी फरार’ असे जानकर यांनी सरकारला ठणकावून सांगितले.यावेळी संदीप कारंडे, उपसरपंच धुळा डावरे, सिद्राम भाणसे, लक्ष्मण पुजारी, राणोजी पुजारी, नारायण मोठे, बाबूराव हजारे, नागेश पुजारी, राजू दलवाई, तात्यासो हराळे, कृष्णात शेळके, स्वप्निल नांगरे, अभिजित कोळेकर आदींसह समाजबांधव उपस्थित होते.फूट पाडण्यासाठी टोळी कार्यरतआरक्षण लढ्यात फूट पाडण्यासाठी एक मोठी टोळी कार्यरत आहे. मात्र, त्याला समाजच प्रत्युत्तर देईल. तसेच प्रत्येक मेंडक्याने कापलेल्या बोकडाचे कातडे जरी दिले तरी हे आंदोलन मोठं होईल हे सांगत, स्वार्थ ठेवून आंदोलनाला मदत करणाºयांना पडळकर यांनी टोला लगाविला.