शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
3
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
4
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
5
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
6
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
7
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
8
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
9
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
10
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...
11
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
12
Gold Rates 13 May : एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
13
Swapna Shastra: पाण्याशी संबंधित कोणतेही स्वप्नं आगामी सुख दु:खाची देतात चाहूल; कशी ते पहा!
14
Operation Keller: सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार
15
घरची कामं करा अन् फिट राहा; केर काढा, लादी पुसा, कपडे धुवा... पाहा किती कॅलरी होतात बर्न?
16
'ऑपरेशन सिंदूर'नंतर रशियाची भारताला मोठी ऑफर; पाकिस्तानसह अमेरिकेचीही झोप उडवणार
17
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्थानचा बहिष्कार? भारत कोणत्या वस्तू आयात करतो?
18
सर्वोच्च न्यायलयाने फेटाळला दिल्लीतील व्यावसायिकाचा जामीन अर्ज,ड्रग्ज आणि लष्कर-ए-तोयबाशी आहे कनेक्शन!
19
बारावी नापास डॉक्टर! रुग्णांच्या जीवाशी खेळ; क्लिनिक उघडून मोठे आजार बरे करण्याचा दावा
20
पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेस का निवडला? एकाच झटक्यात पाकिस्तानची खोट्याची ८ मिसाईल पाडली...

अल्पसंख्याक दर्जासाठी एकत्र या

By admin | Updated: September 11, 2014 23:16 IST

काका कोयटे : लिंगायत समाजाचा ‘आनंद मेळावा’ उत्साहात

कोल्हापूर : लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा देण्याची केंद्र शासनाकडे शिफारस, अकरा पोटजातींंचा इतर मागास प्रवर्गांत समावेश करण्याचा, तसेच तीन पोटजातींचा विशेष मागास प्रवर्गात समावेश करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे केंद्राबरोबरच्या पुढील लढ्यासाठी समाजबांधवांनी मतभेद विसरून एकत्र यावे, असे आवाहन लिंगायत समाज संघर्ष समितीचे अध्यक्ष काका कोयटे यांनी केले. कोल्हापूर लिंगायत समाज संस्था व लिंगायत समाज संघर्ष समिती यांच्यावतीने आज, गुरुवारी शाहू स्मारक भवन येथे झालेल्या आनंद मेळाव्यात ते बोलत होते. कोयटे म्हणाले, लिंगायत समाजाला ‘वीरशैव’ या नावानेही यापूर्वी ओळखले जात होते. मात्र, या समाजाला राज्य शासनाच्या आरक्षणामध्ये लाभ मिळत नव्हता. गेली वीस वर्षे ही मागणी प्रलंबित होती. याकरिता सर्व समाजबांधवांनी एकत्र येणे गरजेचे होते. म्हणून लोकसभा निवडणुकीवेळी आंदोलनाचे हत्यार उपसले. यादरम्यान आघाडी सरकारला लिंगायत समाजाची ताकद कळून आली. आझाद मैदान येथे धरणे आंदोलन केले. त्याला पाठिंबा देण्यासाठी मंत्री व आमदार यांची रांग लागली होती. त्यामुळे आपली ताकद कळल्याने आंदोलन आणखी तीव्र केले. या आंदोलनानंतर राज्य शासनाने निर्णय घेतला नाही. कऱ्हाड येथे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या गावातच आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. याकरिता सोशल मीडियाचा वापर करीत समाजबांधवांना एकत्र येण्याचे आवाहन केले. त्यानुसार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळानजीकच उपोषणास प्रारंभ केला. त्याला मुख्यमंत्र्यांनी प्रथम दाद दिली नाही. आंदोलन तीव्र केल्यानंतर सरकारकडून आंदोलन मागे घेण्याची विनंती करण्यात आली. मात्र, आंदोलनावर ठाम असलेल्या संघर्ष समितीने हा लढा आणखी एका दिवसाने वाढविला. दुसऱ्या दिवशी दिलीप सोपल समितीची स्थापना करण्यात आली. त्यानुसार राज्य शासनाने लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा देण्याची केंद्र शासनाकडे शिफारस, अकरा पोटजातींंचा इतर मागास प्रवर्गात समावेशाचा, तसेच तीन पोटजातींचा विशेष मागास प्रवर्गात समावेश करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अल्पसंख्याक दर्जा मिळविणे व इतर मागासवर्गामध्ये समावेश होण्यासाठी मतभेद विसरून सर्व समाजबांधवांनी एकत्र यावे. यावेळी सरलाताई पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी राज्य अध्यक्ष राजशेखर तंबाके, सुनीलशेठ रुकारी, माजी आमदार मनोहर पटवारी, विजय शेटे, ललिता पांढरे, प्रदीप वाले, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)