शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
रशिया कसं थांबवेल युक्रेन युद्ध? ट्रम्प यांनी UNGA मध्ये सांगितला अमेरिकेचा प्लॅन; पुतिन यांचं टेन्शन वाढणार!
3
पाक गोलंदाजानं केली हसरंगाची कॉपी! मग IND vs PAK मॅचचा दाखला देत इरफाननं काढली 'लायकी' (VIDEO)
4
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
5
पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट; ट्रेन रुळावरून घसरुन उलटली, काही तासांपूर्वीच लष्कराला करण्यात आलं होतं लक्ष्य
6
बिग सरप्राइज! थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली अन् दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात उतरण्यास झाला तयार
7
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
8
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
9
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
10
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
11
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
12
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
13
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
14
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
15
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
16
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
17
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
18
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
19
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
20
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न

‘गोडसाखर’ पतसंस्था निवडणुकीत साखर कारखान्याची रंगीत तालीम

By admin | Updated: February 29, 2016 00:56 IST

६ मार्चला मतदान : श्रीपतराव शिंदे, शहापूरकर विरुद्ध चव्हाण सामना

रमा मगदूम -- गडहिंग्लज  साखर कारखाना कर्मचाऱ्यांच्या निवडणुकीतच सत्ताधारींची कसोटी लागली आहे. या निवडणुकीत उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण समर्थक विरुद्ध माजी अध्यक्ष अ‍ॅड़. श्रीपतराव शिंदे व डॉ. प्रकाश शहापूरकर समर्थक असाच सामना आहे. ही निवडणूक म्हणजे कारखान्याच्या निवडणुकीची रंगीत तालीमच मानली जाते. त्यामुळे पतसंस्थेत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.१९८० मध्ये या पतसंस्थेची स्थापना झाली. कामगारांना प्रापंचिक कारणासाठी अर्थसहाय्य करण्याच्या उद्देशानेच या संस्थेची स्थापना झाली. दरम्यान अनेकवेळा कारखान्यात सत्तांतर झाले. मात्र त्याचा परिणाम पतसंस्थेच्या कामकाजावर कधीच झाला नाही. सर्व कामगारांनी एकजुटीने पतसंस्था चालविली. त्यामुळे पतसंस्थेच्या आजवरच्या सर्व निवडणुका बिनविरोध झाल्या. दरम्यान, दोन वर्षांपूर्वी तत्कालीन अध्यक्ष अ‍ॅड़ श्रीपतराव शिंदे आणि विद्यमान उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण यांच्यात मतभेद झाले. त्यातूनच शिंदेंच्यावर अविश्वास ठराव आणून त्यांना अध्यक्षपदावरुन हटविण्यात आले. त्यानंतर मुश्रीफ यांच्या सहकार्याने कारखाना ब्रीक्स कंपनीला चालवायला देण्यात आला. त्यानंतरच्या राजकीय घडामोडीमुळेच निवडणुकीतील बिनविरोधाच्या प्रयत्नाला ‘खो’ बसला.गडहिंग्लज कारखान्यांच्या सर्व कर्मचारी या पतसंस्थेचे सभासद आहेत. कारखान्याचे संस्थापक स्व.आप्पासाहेब नलवडे, माजी अध्यक्ष अ‍ॅड़ शिंदे व डॉ. शहापूरकर यांनी नेमलेले कर्मचारी अजूनही त्यांना मानतात. कामगार ते काखान्याच्या उपाध्यक्षपदी पोहचलेले चव्हाण यांनाही मानणारे काही निवडणुकीच्या पाश्वभूमीवर शिंदे व शहापूरकर या दोघांना मानणाऱ्या कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन चव्हाण समर्थकांना अव्हान दिले आहे. त्यामुळेच नेत्यांच्या प्रतिष्ठेची ठरलेल्या या निवडणुकीतही मोठी चुरस आहे.उपाध्यक्ष चव्हाण यांना हरविण्यासाठी कारखाना निवडणुकीत शिंदे व शहापूरकर यांच्यासह मुश्रीफ विरोधी सर्वच पक्ष गट एकत्र येण्याच्या हालचाली सुरू आहेत. राजकीय ध्रुवीकरणाची पहिली प्रतिक्रिया पतसंस्थेच्या निवडणुकीलाही प्राप्त झाली आहे. म्हणूनच याकडेही जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. पतसंस्थेचे ६९0 सभासदगोडसाखर पतसंस्थेच्या सभासदांची एकूण संख्या ६९० इतकी आहे. त्यामध्ये अ‍ॅड़ शिंदे यांच्या कारकीर्दीत नेमलेले ४२९ आणि डॉ. शहापूरक यांच्या कारकीर्दीतील १४० कर्मचारी आहेत. त्यामुळेच दोघांची मिळून किमान ४० मते मिळतील असा विरोधी पॅनेलचा दावा आहे. कामगारांतही दुफळीगोडसाखर पतसंस्थेत प्रकाश चव्हाण समर्थकांचे सत्ताधारी गौळदेव पॅनेल आणि शिंदे व शहापूरकर समर्थकांचे विरोधातील गौळदेव परिवर्तन पॅनेल असा चुरशीचा दुरंगी सामना होत आहे. ६ मार्च रोजी मतदान व निकाल आहे. कारखान्याच्या २४,४५० सभासदांपैकी कर्मचारी पती-पत्नी सभासदांची संख्या सुमारे १८०० आहे. सेवेतील कामगारांच्या थकीत पगाराप्रमाणेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या देय रकमादेखील अद्याप मिळायच्या आहेत. त्यामुळेच कामगारांसह त्यांच्या नात्या-गोत्यांची मते निर्णायक ठरणार अहेत. कंपनीला कारखाना चालवायला देऊन शेतकऱ्यांच्या ऊस बिलासह कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर देण्याचा प्रयत्न चव्हाणांनी केला. मात्र विधानसभा निवडणुकीत प्रचाराची सक्ती झाली. यामुळेच कामगारातही दुफळी पडली आहे.