ओरोस : जिल्हाधिकारी भवनातील शासकीय ग्रंथालयातील चार सीसीटीव्ही कॅमेरे, लेन्स बुलेट कॅमेरे, तीन झूम कॅमेरे आदी १ लाख ३५ हजार ६५ रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेल्याची धक्कादायक बाब मंगळवारी उघडकीस आली. याबाबत अज्ञाताविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.जिल्ह्यात चोरीचे सत्र अद्यापही सुरू असून, आता तर चोरट्यांनी शासकीय कार्यालयांना टार्गेट केल्याचे दिसून येत आहे. जिल्हाधिकारी भवनामध्ये तिसऱ्या मजल्यावर शासकीय ग्रंथालय आहे. या ग्रंथालयामध्ये चोरी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. याबाबतची तक्रार श्रेया श्रीनिवास गोखले (रा. ओरोस) यांनी ओरोस पोलीस स्थानकात नोंदविली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार येथील शासकीय ग्रंथालयातील चार सीसीटीव्ही कॅमेरे, लेन्स बुलेट कॅमेरे, तीन झूम कॅमेरे, रेकॉर्ड डीव्हीडी, तोशिबा कंपनीचा बॅकअप सिडीचा बॉक्स असा १ लाख ३५ हजार ६५ रुपये किमतीचा माल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे. त्यानुसार अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास ओरोस पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक अनिरुद्ध देसाई करीत आहेत.भिंतीवर चढून ग्रंथालयात प्रवेशचोरट्यांनी ग्रंथालयात भिंतीवर चढून खिडकीतून प्रवेश केला असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. इमारतीच्या आजूबाजूला मोठी झाडे असल्यामुळे कदाचित झाडांचा आधार घेत चोरट्यांनी ग्रंथालयात प्रवेश केला असावा. तसेच हा चोरीचा प्रकार २४ जुलै रोजी सायंकाळी ६ नंतर ते २८ जुलै या कालावधीत झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. हाकेच्या अंतरावर पोलीस असूनही चोरीज्या ठिकाणी चोरी झाली त्या ठिकाणावरून ५० मीटर अंतरावर रात्रीच्या वेळी निवडणूक विभागामध्ये व कोषागार कार्यालयात पोलीस तैनात असतात. मात्र त्यांच्या या पहाऱ्याला छेद देत चोरट्यांनी धाडसी चोरी केली आहे.
जिल्हाधिकारी भवनातील माल लंपास
By admin | Updated: July 29, 2015 00:42 IST