शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

देशी गायींच्या संवर्धनासाठी सामूहिक प्रयत्न हवेत

By admin | Updated: July 12, 2015 21:21 IST

काडसिद्धेश्वर स्वामी : कणेरी मठावर राष्ट्रीय गोसंवर्धन संमेलनाचे उद्घाटन

कणेरी : पूर्वी भारतात ज्यांच्या घरात देशी गायी असत, त्या घरात कोणतेही आजार नसत; पण सध्या सगळीकडे जर्सी गायींचे दूध पोषणासाठी वापरल्यामुळे विविध प्रकारच्या आजारांची संख्या वाढत आहे. देशी गायींच्या दुधामध्ये स्निग्धतेचे प्रमाण चांगले असून, ते निरोगी शरीरासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे नागरिकांनी देशी गायींच्या संवर्धनासाठी सामूहिक प्रयत्न केले पाहिजेत, असे प्रतिपादन कणेरी मठाचे मठाधिपती काडसिद्धेश्वर स्वामी यांनी कणेरी मठावर आयोजित राष्ट्रीय गोसंवर्धन संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी केले.यावेळी काडसिद्धेश्वर स्वामी म्हणाले, भारतात देशी गायींची संख्या कमी होत आहे. त्यांचे संवर्धन केले पाहिजे. गोमातेला प्रतिष्ठा दिली पाहिजे. देशी गायींच्या दुधात बॅक्टेरियाचे प्रमाण जास्त असल्याने शरीर निरोगी राहते. गोसंवर्धनासाठी सोशल मीडियाचा वापर करून प्रत्येकाने गोनिर्मित वस्तूंचा स्वीकार करावा. देशी गायींच्या दुधामुळे मानवाच्या सकारात्मक विचारांमध्ये वाढ होते.दिल्लीच्या अखिल भारतीय कृषी गोसेवा संस्थेचे केसरी चंद्र मेहता म्हणाले, देशी गायीचे दूध आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. या दुधापासून तयार होणाऱ्या दूध, दही, ताक, तूप व शेण यांचा मानवाने वापर केल्यास कोणताही आजार होत नाही. गोहत्याबंदीनंतर राज्यातील मांसाच्या किमती ४० टक्के वाढल्या आहेत.संमेलनाला महाराष्ट्र, कर्नाटक, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, झारखंड, प. बंगाल, ओडिसा, दिल्ली, गुजरात आदी राज्यांतून १५० गोभक्त हजर होते. १३ जुलैपर्यंत हे संमेलन चालणार आहे. संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी मुप्पीन, काडसिद्धेश्वर स्वामी, अण्णासाहेब जाधव, पंडित रामस्वरूप, श्रीमती मधुकामता बेन, बगाडे काका, सुदर्शन ढंढारिया, आदी मान्यवर उपस्थित होते. श्याम बिहारी गुप्ता यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)‘गोकुळ’तर्फे देशी गायींसाठी अनुदानकोल्हापूर जिल्हा दूध संघ उत्पादन वाढीसाठी म्हैस व जर्सी गायींसाठी अनुदान देते; पण आता देशी गायींसाठीदेखील प्रति गाय १०,००० रुपये अनुदान देणार असल्याची माहिती संघाचे संचालक अरुण डोंगळे यांनी काडसिद्धेश्वर स्वामीजींना चर्चेवेळी सांगितले.