शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेच्या आमदारांच्या पोटात गोळा

By admin | Updated: January 31, 2017 22:59 IST

स्वतंत्र ताकद दाखवा : दहा तालुक्यांत अन्य कुणाशी तरी आघाडी करूनच लढण्याची शक्यता

समीर देशपांडे --- कोल्हापूर --जिल्हा परिषदेत भाजपशी युती करणार नसल्याची स्पष्ट भूमिका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केल्यामुळे सेनेच्या ग्रामीण भागातील पाच आमदारांच्या पोटात गोळा आला आहे. कारण दोन्ही कॉँग्रेसमधील असंतुष्टांच्या सहकार्याने विधानसभा गाठणाऱ्या या आमदारांचा आता खरा कस लागणार असून, त्यांच्या शक्तीची झाकली मूठ आता उघड होणार आहे. त्यामुळे बारा तालुक्यांपैकी कागल आणि करवीर वगळता दहा तालुक्यांमध्ये शिवसेना अन्य कुणाशी तरी आघाडी करूनच लढेल, असे सध्याचे चित्र आहे. अडीच वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कोल्हापूर जिल्'ातील दहापैकी शिवसेनेचे तब्बल सहा आमदार निवडून आले. पश्चिम महाराष्ट्रातील धनुष्यबाणाच्या चिन्हावर इतके आमदार निवडून देणारा जिल्हा म्हणून कोल्हापूरची चर्चा झाली. या सहापैकी राजेश क्षीरसागर हे कोल्हापूर शहरातील उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. उर्वरित पाच आमदार हे ग्रामीण भागातून निवडून आले आहेत. कोल्हापूर जिल्'ातील गेल्या २५ वर्षांपासून शिवसेना गावागावांत रुजली असली तरी दोन्ही कॉँग्रेसच्या सहकारी संस्थांच्या तडाख्यात ती भरारी घेऊ शकली नव्हती; परंतु गेल्या विधानसभेला कधी नव्हे ते एवढे यश मिळाले. युतीच्या सरकारमधील दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री असलेले चंद्रकांतदादा पाटील यांनी शिवसेनेला फार पुढे जाऊ दिले नाही. शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर आणि पाटील यांच्यामध्ये जाहीर शाब्दिक चकमकी घडल्या होत्या. परिणामी कोल्हापूर महापालिकेच्या सत्तासंघर्षात अनुपस्थित राहत शिवसेनेने अप्रत्यक्षपणे दोन्ही कॉँग्रेसना सहकार्य करण्याची भूमिका घेतली. आता तर जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्येही भाजपसोबत कुठेही युती करणार नसल्याचे ठाकरे यांनी जाहीर केल्याने या ग्रामीण पाच आमदारांची जबाबदारी वाढली आहे. हे आमदार स्वत:च्या मोठ्या गटाच्या जोरावरच आमदार झाले, अशातला भाग नाही. प्रकाश आबिटकर यांना आजरा, भुदरगड, राधानगरीतील कॉँग्रेस, राष्ट्रवादीतील असंतुष्टांनी उघडपणे मदत केली. उल्हास पाटील यांना शिरोळमध्ये बहुजन विकास आघाडीने मदत केली आणि ते आमदार झाले; परंतु त्यांना पाठिंबा देणारी बहुजन विकास आघाडी पंधरा दिवसांपूर्वी भाजपमध्ये गेली आहे. सत्यजित पाटील यांना राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी असलेल्या मानसिंगराव गायकवाड गटाने मदत केली आणि ते आमदार झाले. हातकणंगले तालुक्यातील दोन्ही कॉँग्रेसच्या राजकारणामध्ये सुजित मिणचेकर यांनी दुसऱ्यांदा बाजी मारली. नाही म्हणायला करवीर तालुक्यात चंद्रदीप नरके यांनी आपला स्वतंत्र गट चांगल्या पद्धतीने उभारला आहे. कुंभी-कासारी साखर कारखान्याच्या माध्यमातूनही त्यांना गट मजबूत करणे सोयीचे ठरले.