शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची १०० टक्के माहिती गोळा करा, जिल्हाधिकारी, आयुक्तांचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 18:52 IST

शहरामध्ये दैनंदिन सर्व्हे करताना रुग्ण समजून आले पाहिजेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असून वैद्यकीय अधिकारी व त्यांच्या पथकांनी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर द्यावा. १४३ कंटेन्मेंट झोनची कडक अंमलबजावणी करा. कंटेन्मेंट झोनमधील कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची १०० टक्के माहिती गोळा करा, असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिले.

ठळक मुद्देकॉन्टॅक्ट ट्रेसिंगची १०० टक्के माहिती गोळा करा, जिल्हाधिकारी, आयुक्तांचा आदेशवैद्यकीय, समन्वय अधिकारी, प्रभाग समिती सचिव यांच्यासोबत आढावा बैठक

कोल्हापूर : शहरामध्ये दैनंदिन सर्व्हे करताना रुग्ण समजून आले पाहिजेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असून वैद्यकीय अधिकारी व त्यांच्या पथकांनी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर द्यावा. १४३ कंटेन्मेंट झोनची कडक अंमलबजावणी करा. कंटेन्मेंट झोनमधील कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची १०० टक्के माहिती गोळा करा, असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिले.ह्यलोकमतह्णने शनिवारच्या अंकात ह्यकॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये हयगयह्ण या शीर्षकाखाली वृत्त प्रसिद्धीस दिले. याची दखल जिल्हाधिकारी दौलत देसाई, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी घेतली. त्यांनी तातडीने शनिवारी या संदर्भात अधिकारी, वैद्यकीय, समन्वय अधिकारी व प्रभाग समिती सचिव यांच्याशी जिल्हाधिकारी कार्यालय येथून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतला.जिल्हाधिकारी, आयुक्त यांनी केलेल्या सूचना

  • होम आयसोलेट असलेल्या व्यक्तींवर लक्ष ठेवा.
  • होम क्वारंटाईन बाहेर फिरताना आढळल्यास कारवाई करा.
  • कंटेन्मेंट झोनमध्ये अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांनी दररोज भेटी दिल्या पाहिजेत.
  • लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, शिक्षक व स्थानिक लोकांची मदत घ्या.
  • शहरामध्ये होम टू होम सर्व्हे करा.
  • सर्व्हे करताना इतर आजारांची लक्षणे (चिकनगुनिया, डेंग्यू, वगैरे) असलेल्या नागरिकांची माहिती गोळा करा.
  • विशेष मोहिमेदरम्यान, गरज भासल्यास अँटिजेन टेस्ट करा.
  • नोडल ऑफिसरांनी नेमलेल्या रुग्णालयात दैनंदिन भेट दिली पाहिजे.

कुटुंबकल्याण केंद्रामध्ये स्राव तपासणीस्रावसाठी सीपीआर, डी. वाय. पाटील हॉस्पिटल व आयसोलेशन येथे गर्दी वाढत आहे. ती कमी करण्यासाठी महापालिकेच्या कुटुंब कल्याण केंद्रामध्ये स्राव तपासणीचे नियोजन करा, अशा सूचना दिल्या.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर